shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण :(१०६)...! औषधी वृक्ष :करंज ....!


      करंज वृक्षांला मराठीमध्ये करंज, करंजी, हिंदीमध्ये किरमल, कांजा, संस्कृतमध्ये पूतीकरंज तर इंग्रजीमध्ये Indian beech tree, Kerong असे म्हणतात. 

करंजाचे झाड. सर्वत्र आढळते. विशेष करून गावामध्ये पाणथळ जागेत, नदीकिनारी, खाडीकिनारी समूहाने करंजाचे वन असते.

याचे औषधी गुणधर्म म्हणजे अंग दुखत असल्यास, सांधेदुखी झालेली असल्यास याच्या पानांचा शेक देतात. मुळव्याधी, जखमेतील किडे काढण्यासाठी करंजाच्या ताज्या सालीचा रस वापरतात. परम्यासाठी मुळांचा रस वापरतात. करंजाची फुले मधुमेहावर गुणकारी आहेत.  गजकर्ण, चाई, अंगाची आग, खरूज, लूथ अशा सर्व प्रकारच्या त्वचारोगावर करंजाचे तेल वापरावे. सांधेदुखी व अंगदुखीसाठीदेखील करंज तेल हे उपयुक्त आहे. करंजाचे तेल पिवळे असते. बैलगाडीच्या चाकाला तसेच अन्यत्र वंगण म्हणूनही याचा वापर करतात. इंधन म्हणूनही करंज तेलाचा वापर होतो. करंजाची पाने खत म्हणून वापरावी. शेतातील कीटक, किडे, आळ्या यामुळे मरतात व पिकांवर रोग येत नाही.

हे झाड कसे ओळखावे तर हा वृक्ष सदाहरित घनदाट सावलीचा, पाने चकचकीत असतात .फुलांचे तुरे असतात. फळे चपटी तपकिरी रंगाची, करंजीच्या आकाराची शेंग रुपात, टणक असतात. शेंगेमध्ये एकच मांसल, पांढरट लालसर रंगाची बी असते.
साल पांढरी गुळगुळीत ठिपक्याची तर आंतरसाल पिवळी असते.

वरील औषधी व शेती विषयक गुणधर्म लक्षात घेता करंजाचे झाड पर्यावरणरक्षणामध्ये लाख मोलाचे आहे.
करंज विपुल प्रमाणात आजूबाजूस आढळतो. याचे गुणधर्म समजून घेऊन ते इतरांना सांगा व कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या पर्यावरण साक्षरता उपक्रमात सहभाग नोंदवा.

 *कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या विद्यमाने पर्यावरण जनजागरण साक्षरता मोहिमेंतर्गत प्रसारित.
*लेखक : चंद्रकांत शहासने निसर्गोपचारक, पुणे.
*मोबाईल क्रमांक :९८८१३७३५८५.
close