shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

युवाशक्ती ग्रामविकास संगठन, सामाजिक संघटनेच्या अध्यक्ष पदी दादासाहेब विधाते यांची निवड

प्रतिनिधी : संजय वायकर

अ .नगर : २७ /  युवाशक्ती ग्रामविकास संगठन, महाराष्ट्र राज्य ही एक सामाजिक संघटना असून  संस्थापक अध्यक्ष इमरान पठाण यांचे मार्फत नगर जिल्हयातील कार्यकारिणी साठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यांनी
 केलेल्या निवडीनुसार व आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्यातून मूलाखती द्वारे जेऊर येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब विधाते यांची अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे .
            श्री . दादासाहेब विधाते

 ग्रामपंचायत कारभाराविषयी माहिती, शासकीय योजनांची माहिती तसेच माहिती अधिकार  याबाबत जनसामान्यांमधे जनजाग्रुती करून सामान्य नागरीकांचे जीवनमान उंचावण्यासाठी व युवाशक्ती ग्रामविकास संगठन, सामाजिक संघटना वाढविण्यासाठी दादासाहेब विघाते यांनी नेहमी तत्पर राहुन संघटनेचे कार्य करत रहावे अशी अपेक्षा ठेवून युवाशक्ती ग्रामविकास संगठन, सामाजिक संघटनेच्या अध्यक्ष पदी दादासाहेब विधाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्व मुलाखतीनंतर अहमदनगर जिल्ह्यासाठी युवाशक्ती ग्रामविकास संगठनची जिल्हा कार्यकारिणी खालीलप्रमाणे राहणार आहे.

श्री दादासाहेब भाऊसाहेब विधाते - अध्यक्ष,श्री शेख जाविद फकीर - उपाध्यक्ष ,श्री सुनिल नामदेव काळे - सचिव, श्री बबन गोरख रोहकले - कोषाध्यक्ष, श्री शरद भगत - सहसचिव, श्री रमेश गंगाराम खेमनर - सहकोषाध्यक्ष ,श्री नारायण संपत कराळे - जिल्हा जनजागृती अभियान ,
श्री गणेश सूर्यकांत मगर -जिल्हा जनजागृती अभियान उपप्रमुख ,श्री अमोल दामोधर जगधने - सोशल मिडिया प्रसिद्धी प्रमुख ,  श्री गौतम सुरेश दांगडे - सोशल मिडिया प्रसिद्धी उपप्रमुख,श्री ज्ञानदेव गहिनीनाथ गोरडे- प्रिंट मिडिया प्रसिद्धी प्रमुख,श्री संतोष रामचंद्र भंगारे -प्रिंट मिडिया प्रसिद्धी उपप्रमुख , श्रीअतुल सुरेश पवार -नियोजन जिल्हा प्रमुख .

 जिल्हा कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन करून संघटनेच्या उद्देशपुर्तीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या .

 ग्रामपंचायत कारभाराविषयी माहिती, शासकीय योजनांची माहिती तसेच माहिती अधिकार (RTI) याबाबत आपल्या संघटनेच्या माध्यमातून जनसामान्यांची नेहमी जनजागृती होत राहील हीच प्रत्येक सदस्याकडून संघटनेला अपेक्षा आहे असे
श्री इमरान पठाण संस्थापक अध्यक्ष यांनी सांगितले . डॉ. श्री पुरुषोत्तम सदार सचिव  युवाशक्ती ग्रामविकास संगठन, महाराष्ट्र राज्य यांनी सर्वांचे अभिनंदन केले .

यावेळी युवाशक्ती ग्रामविकास संगठन, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इमरान पठाण आणि संपूर्ण पदाधिकारी यांच्या वतीने, तसेच संपूर्ण मित्र परिवार, आणि गावकरी  यांच्या वतीने दादासाहेब विधाते यांचे अभिनंदन केले जात आहे . तसेच त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .
close