shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज येथे कौटुंबिक महिला अत्याचार व हुंडाबळी या विषयावर प्रशिक्षण संपन्न..!!



----------------------------------------------------
प्रकाश मुंडे| बीड जिल्हा प्रतिनिधी:- 
केज पोलीस स्टेशन मध्ये कौटुंबिक अन्याय अत्याचार, हिंसाचार व हुंडाबळी या विषयावर सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे व संतोष मिसळे यांच्या उपस्थितीत तपासी पोलीस अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडले.


या बाबतची माहिती अशी की, केज पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी सपोनि शंकर वाघमोडे व सपोनि संतोष मिसळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विवाहित स्त्रियांवर सासरी होणाऱ्या अत्याचार व त्या अनुषंगाने पोलीस ठाण्यात दाखल होणारे गुन्हे या संबंधी प्रशिक्षण संपन्न झाले. या वेळी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी गुन्हे दाखल करण्या पासून ते जाब-जबाब नोंदविणे आणि सर्व तपास पूर्ण करून चार्ज शीट न्यायालयात पाठविण्या पर्यंत कराव्या लागणाऱ्या तपास, टिपणी व इतर बाबींची माहिती प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांना दिली. 


कौटुंबिक हिंसाचार व हुंडाबळी या कायद्यात वेळोवेळी झालेले बदल आणि दुरुस्त्या याची देखील माहिती दिली. त्याच बरोबर गुन्हे दाखल करून घेत असताना सविस्तर फिर्याद नोंदवून; त्या संबंधी तपास करीत असताना पीडित विवाहितेने सासरी होणाऱ्या छळा संबंधी वेळोवेळी नातेवाईकांना दिलेली माहिती आणि त्या संबंधी संबंधितांना नातेवाईकांनी दिलेली समज; या सर्व बाबींचा उल्लेख करून सुक्षमपणे तपास केल्यास दोषींना शिक्षा होऊ शकते. हे देखील नमूद केले. 

या प्रशिक्षणाला पोलीस जमादार रुक्मिणी पाचपिंडे, नागरगोजे, उमेश आघाव, अशोक गवळी, जिवन करवंदे, मंगेश भोले, बाळासाहेब अहंकारे, राजू गुंजाळ, महादेव बहिरवाळ, शेख मतीन, अशोक नामदास आदी कर्मचारी उपस्थित होते.
close