पुढील एक महिन्यात योग्य ती कारवाई न झाल्यास मा.जिल्हाधिकारी साहेब यांचेकडे तक्रार करुन संबंधित अभियंत्यांना खड्डयांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत दालनात कोंडण्याचा शिवप्रतिष्ठानने दिला ईशारा...!
अपघातांना कारणीभूत ठरत असलेल्या रस्त्यावरील खड्डयात शिवप्रतिष्ठाण वृक्ष लागवड आंदोलन पुढेही करणार - राहुल ढेंबरे पाटील
संगमनेर । प्रतिनिधी :-
सोमवार दि.२७/०९/२०२१ रोजी सकाळी ठिक १०.३०वा. रस्त्यांवरील खड्डयांत वृक्षलागवड आंदोलन करण्यात आले. वेळोवेळी पाठपुरावा करुन निवेदने देऊन देखील सबंधित प्रशासनाकडुन उडवाउडवीची उत्तरे तसेच कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने साकुर पठार भागातील ग्रामस्थ व शिवप्रतिष्ठाण, महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.
तहसीलदार,उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार, खासदार, पालक मंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक, घारगांव पोलीस स्टेशन तसेच सबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सदर निवेदन देण्यात आले होते,
शिवप्रतिष्ठाण, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा करून देखील सबंधित प्रशासनाने योग्य ती कार्यवाही न केल्यामुळे सोमवार दि.२७/०९/२०२१ रोजी सकाळी १०.०० वा साकुर पठार भागातील नागरिकांच्यावतीने रस्तावरील खड्डयांत वृक्षलागवड आंदोलन सर्व शासकीय नियम पाळत करण्यात आले.
साकुर पठार भागातील बहुतांश रस्ते हे खड्डेमय झाले असून अपघातांचे प्रमाण देखील तुफान वाढले आहे. शेतकऱ्यांना मालवाहतूक करण्यासाठी खुप अडचणी निर्माण होत आहेत.
त्यामध्ये मुख्यत्वे..
१.रणखांब फाटा ते दरेवाडी
२.साकुर ते नांदुर खंदरमाळ (जांबुत मार्गे)
३.साकुर ते बिरेवाडी फाटा
(१ किमीचे नवीन डांबरीकरण २ महीन्यात खड्डेमय इतर सर्व रस्ताच खड्डेमय-४ किमी)
४.मांडवे बुद्रुक ते वरवंडी
साकुर पठार भागातील तमाम जनतेच्या वतीने या आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. तरी सदर निवेदनावर जनसामान्यांच्या होणाऱ्या हाल-अपेष्टा लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही व्हावी असे निवेदनात म्हटले होते.असा ईशारा दिल्यानंतर देखील प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही तसेच कार्यवाही केली नाही.
रणखांब फाटा ते दरेवाडी
सदर रस्त्याची जबाबदारीच सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजना दोन्ही विभाग जबाबदारी स्वीकारत नाहीत.२००९ ला झालेल्या सदर रस्त्याला गेली दोन वर्षांपासून कोणी वालीच उरला नाही तर या रस्त्याचे काम होणार तरी कसे ? असा प्रश्न ग्रामस्थांना सतावत आहे.
दळणवळणासाठी रस्ते हेच पठारभागाचे मुख्य स्रोत असल्यामुळे शेतकऱ्यांना मालवाहतूक, खते-औषधे आणण्यासाठी तसेच प्रवास करताना नागरिकांना जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
शासनदरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेतली जात नसेल आणि व्रुक्षलागवड अंदोलन करुन देखील सबंधित प्रशासन झोपेचे सोंग घेत असेल तर मा.डॉ. राजेंद्र जी भोसले साहेब (जिल्हाधिकारी, अहमदनगर)यांचेकडे तक्रार देऊन संबंधित कार्यकारी अभियंत्यांना त्यांच्या दालनात कोंडल्याशिवाय दुसरा पर्याय नाही असे शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील यांनी म्हटले आहे. शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटना व समस्त ग्रामस्थ साकुर यांचे वतीने खड्डेमय रस्त्यावर वृक्ष लागवड करण्यात आली.
आंदोलन प्रसंगी
शिवश्री राहुल ढेंबरे पाटील, संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शिवप्रतिष्ठाण, महाराष्ट्र राज्य,
हौशीराम मिंडे राज्य संघटक शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य ,शिवनाथ नाईकवाडी संगमनेर तालुका संघटक ,सुरेश सहाणे जुन्नर तालुका संघटक
युवानेते निलेश मनसुक, गणेश श्रीराम संगमनेर तालुका संघटक राहुल गाडे पाटील राहुरी तालुका संघटक,योगेश ढेंबरे, मयूर ढेंबरे, विश्वनाथ सागर, अजित ढेंबरे, पांडुरंग शेजवळ, सचिन खेमनर, संतोष खेमनर, विकास ढेरंगे, संतोष बारवे, सूर्यभान शेजवळ, रुपचंद गुळवे, विकास मनसुक, सोपान मनसुक, गणेश मनसुक, बाळासाहेब गुळवे, संजय गुळवे आदी ग्रामस्थ साकुर पठारभागातून उपस्थित होते.

