वालचंदनगर बाजारपेठेत डासांचे साम्राज्य वाढु नये त्यासंदर्भातची औषध फवारणी करा- अमरसिंह निंबाळकर.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वालचंदनगर अध्यक्ष अमरसिंह निंबाळकर यांच्या वतीने ग्रामसेवक यांना दिले पत्र.
इंदापूर प्रतिनिधी:(२७सप्टेंबर२०२१)डेंगू ,चिकनगुनिया, मलेरिया या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये. वालचंदनगर बाजारपेठेत डासांचे साम्राज्य वाढु नये त्यासंदर्भातची औषध फवारणी ग्रामपंचायत वालचंदनगरच्या वतीने करावी यासंदर्भातील दि. २७ सप्टेंबर २०२१ रोजी ग्रामसेवक, सरपंच यांच्या नावे ग्रामसेवक घोगरे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वालचंदनगर अध्यक्ष अमरसिंह निंबाळकर यांच्या वतीने पत्र देण्यात आले.
यावेळी वालचंदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अमरसिंह निंबाळकर, हर्षवर्धन गायकवाड, कांबळे इत्यादी उपस्थित होते.
वालचंदनगर ग्रामपंचायत येथील बाजारपेठ व लगतच्या बहुतांश ठिकाणी गवत वाढलेले आहे
तसेच पाऊस पडलेला असून सध्या सर्वत्र डेंगू, चिकनगुनिया, मलेरियाची पेशंट सापडत आहेत. अशा परिस्थितीत आपल्या भागात डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बाजारपेठेतील वाढलेले गवत तसेच डासांच्या औषधाची फवारणी करणे आवश्यक आहे. सर्व ठिकाणी औषध फवारणी करणे गरजेचे आहे अशा आशयाचे पत्र ग्रामपंचायत वालचंदनगर यांच्याकडे सुपूर्त (दि.२७)करण्यात आले आहे.

