पशुपालकांनी सर्व जनावरांना लसीकरण करून घ्यावे - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील पशुपालकांना केले आवाहन .
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील सर्व पशु पालकांनी सर्व जनावरांना लसीकरण करून घ्यावे असे
राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत लाळ खुरकूत रोग प्रतिबंधात्मक लसीकरण दुसऱ्या फेरीचा शुभारंभ प्रसंगी ( दि. १८ सप्टें.) रोजी इंदापूर तालुक्यातील मौजे लासुर्णे येथे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्यांनी आवाहन केले.
सदर लसीकरण कार्यक्रम पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण तालुक्यात राबविली जात आहे, तालुक्यात एकूण मोठी जनावरे ०१ लाख ७० हजार ४६५ एवढी असून सदर जनावरांसाठी एकूण ०१ लाख ५८ हजार लाळ खुरकत लस मात्रा इंदापूर तालुक्यासाठी प्राप्त झाली आहे, सदर लस तालुक्यांमधील संपूर्ण मोठ्या जनावरांना टोचली जाणार आहे. लाळ खुरकूत लसीकरण दुसरी फेरी २१ दिवसांमध्ये तालुक्यात पूर्ण करण्यात येणार आहे. तालुक्यामध्ये सध्या ठराविक भागात लाळ खुरकत रोगाची लक्षणे दिसत आहेत, त्यामुळे सदर लस ही तालुक्यासाठी वरदान ठरणार आहे.
यावेळी ना. दत्तात्रय भरणे यांनी तालुक्यातील संपूर्ण पशुपालकांनी सर्व जनावरांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी अमोल पाटील - व्हाईस चेअरमन छत्रपती साखर कारखाना, सचिन सपकाळ - सदस्य जिल्हा नियोजन समिती पुणे, बाळासो सपकाळ - संचालक, बाबासो जाचक उपसरपंच, अमित चव्हाण - सदस्य ग्रामपंचायत, निखील भोसले - ग्रामपंचायत सदस्य, तुकाराम देवकाते सह इतर सर्व ग्रामस्थ उपस्थित होते
तसेच पशुसंवर्धन विभागाचे डॉ. रामचंद्र शिंदे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती इंदापूर, डॉ. भीमराव जानकर, डॉ. संजय पराडे, डॉ. अभिजीत आटोळे, हनुमंत हेंद्रे, सुनील शिंदे , संजय येवले, काळेल, . साहेबराव शेगर, गोविंद मगर, ज्ञानेश्वर फरगडे, . बाळू जाधव, ग्रामसेवक घोगरे सह इतर सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

