shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हायड्रोसिल कॅम्प चा कोरोनानंतर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या हस्ते पुनश्च शुभारंभ..!

अमरावती । प्रतिनिधी:
आज बुधवार दि 22 सप्टेंबर 2021 रोजी पुणे 6 येथील मा. सहाय्यक संचालक (हत्तीरोग) डॉ कमलापूरकर मॅडम तसेच अकोला येथील मा सहायक संचालक डॉ भंडारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण पथक अमरावती  येथे जिल्हात कोरोनाच्या केसेस कमी  झाल्याबरोबर मा. शल्य चिकित्सक डॉ श्यामसुंदर निकम सर यांच्या अथक  सहकार्याने जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे तळवेल व वलगाव हत्तीरोग उपथकाद्वारे एकूण 14 हायड्रोसील रुग्ण भरती करण्यात आले होतेे. 

त्यापैकी 10 केसेस वर  यशस्वीरित्या शस्त्रक्रिया सर्जन डॉ संतोष राऊत यांच्याद्वारे व भूलतज्ञ डॉ विपीन टोंगळे, डॉ स्वाती बाहेकर, डॉ शीतल सोळंके व जयश्री आंबोरे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली.
 
या कॅम्पचे नियोजन हत्तीरोग अधिकारी डॉ जुनेद सर  यांच्या नेतृत्वाखाली प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रविण चकुले, आरोग्य सहाय्यक श्री सुधाकर चोपकर व आरोग्य सेवक श्री प्रकाश दातीर यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तळवेल येथील आरोग्य सहायक श्री मनोहर, क्षेत्र कर्मचारी श्री दिवाण तसेच वलगाव येथील रात्र चिकित्सालय येथील आरोग्य सहाय्यक श्री माहूरे, आरोग्य सेवक श्री बरडे व क्षेत्र कर्मचारी श्री चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले.


 या वेळी अवैद्यकीय आरोग्य अधिकारी श्री मुंद्रे हजर होते.कार्यक्रम शेवटी, मा. शल्य चिकित्सक डॉ श्यामसुंदर निकम सर यांनी दि 28 सप्टेंबर 21 रोजी उप जिल्हा रुग्णालय मोर्शी येथे असाच प्रकारचे शिबीर डॉ कळसकर वैद्यकीय अधीक्षक यांच्या नेतृत्वाखालीआयोजित केले असल्याचे सांगून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
close