कोरोना सारख्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सद्या सर्वत्र कोविड लसीकरण चालू आहे परंतु काही खेड्यात लसीकरण बाबत आवश्यक तेवढा प्रतिसाद मिळत नाही.परंतु काही खेड्यात मात्र कोविड लसीकरण झपाट्याने चालू आहे.
अशाच प्रकारे *तिवसा तालुक्यातील कोविड लसीकरणासाठी 3353 लक्ष्य असलेल्या वऱ्हा गावात 2633 ग्रामस्थांनी कोविड लस घेऊन "कोरोनामुक्ती"कडे एक पाऊल टाकले आहे.वऱ्हा गावातील लसीकरणासाठी आरोग्य विभागासोबतच ग्रामपंचायत कार्यालयाने मोठ्या प्रमाणावर सहकार्य केल्याने कोविड लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण होत आहे. विशेष आज दिनांक : 22/09/2021 रोजी वऱ्हा गावात बहुउ्देशीय आरोग्य कर्मचारी श्री.आर.टी.आटोळे, ए.एन.एम
श्रीमती कांबळे,सी.एच.ओ.श्रीमती वानखेडे व आशा वर्कर वंधना वाघमारे चार सदस्य असलेल्या टीम ने 250 डोजेज पूर्ण करून आज लसीकरणाचा हा टप्पा पार केला आहे.
तसेच गावातील प्रतिष्ठित राजकीय आजी माजी पदाधिकारी यांचे लसीकरणाला बहुमूल्य सहकार्य लाभत असून लवकरच वऱ्हा गाव 100 टक्के कोविड "लसयुक्त" होऊन "कोविडमुक्त" होणार यात तीळ मात्र शंका नाही.

