shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बुधभुषण फाऊंडेशनच्या व्हा . चेअरमनचा अनोखा उपक्रम ;रक्तदान शिबिर घेवून केला वाढदिवस साजरा .. !!


प्रतिनिधी : संजय वायकर

करमाळा : दि . २२ /  बुधभूषण फाउंडेशनचे व्हाईस चेअरमन दुर्गेश राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि . २२ सप्टेंबर रोजी करमाळा शहरातील भवानी नाका येथील हनुमान मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले . 

कुर्डुवाडी ब्लड सेंटर मार्फत बुधभुषण फाऊंडेशनला सदर रक्तदान शिबिरा निमित्त गौरवपत्र देण्यात येवून सन्मानित करण्यात आले.

 रक्तदान शिबिराला करमाळा शहरातील नागरिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . रक्तदान हेच श्रेष्ठदान समजून अनेक तरुण युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले .

 रक्तदान म्हणजे एखाद्याच्या जीवनात महत्वाचे योगदान असते ,मानवाने जीवनात एखाद्या वेळी तरी अवश्य रक्तदान करावे असे दुर्गेश राठोड यांनी सांगितले . 

करमाळा शहर तसेच परिसरात अनेक तरुणांनी यावेळी स्वच्छेने रक्तदान करून आपणही समाजाचे देणे आहे या पद्धतीने रक्तदान केले . सदर चे रक्तदान शिबिर कुर्डूवाडी ब्लड बँक यांचे आयोजन होते . यावेळी करमाळा शहरातून सुमारे ६६ तरुणांनी रक्तदान केले .

 यावेळी सदर रक्तदानला बुधभूषण फाऊंडेशनचे चेअरमन अमोल दुरंदे यांनी भेट देऊन बुधभूषण फाउंडेशन चे व्हाईस चेअरमन दुर्गेश राठोड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या . बुधभूषण फाउंडेशन चे व्हाईस चेअरमन दुर्गेश राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरला अभूतपूर्व व मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला .

बुधभूषण फाउंडेशनचे सदस्य , मंगेश बागडे, मिलिंद माने, राहुल बागल,अक्षय परदेशी,संदीप चुंग,सुशील कात्रेला,बंडू रासकर, खलील बागवान, गणेश राठोड ,आनंद शहा, सुशिल राठोड, अमोल परदेशी, प्रवीण यादव , विशाल राठोड यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले .
अविनाश राठोड यांनी बुधभूषण फाउंडेशन तर्फे सर्व रक्तदात्यांना अल्पोपहार दिले .
महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला .
close