अशी पावसाची रिमझिम दारी कवी बाबासाहेब पवार यांचे गीत प्रकाशित..!!
श्रीरामपूर । प्रतिनिधी :- श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील कवी गीतकार बाबासाहेब पवार यांचे अशी पावसाची रिमझिम दारी गाणे प्रकाशित झाले आहे हैदराबाद येथील ऑरेंज म्युझिक कंपनी या संगीत कंपनीने गाणे प्रकाशित केले आहे या गीताचे लेखन बाबासाहेब पवार यांनी केले आहे. तर या गीताला स्वरबद्ध संगीतबद्ध विकास साळवे यांनी केले आहे.
बाबासाहेब पवार यांचे अनेक कवितांची व गीतांचे कार्यक्रम आकाशवाणी केंद्रावरून झालेले आहेत त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत ती व सांज ही कविता संग्रह प्रकाशित आहेत अनेक पुरस्कारही त्यांना महाराष्ट्रातून मिळालेले आहेत दरवर्षी त्यांचा काव्यसरिता हा दिवाळी अंक प्रकाशित होत असतो अशी पावसाची रिमझिम दारी या गीताला महाराष्ट्रातून चांगला रसिकांचा प्रतिसाद मिळत आहे युट्युब वर त्यांची अनेक गाणे प्रकाशित आहेत.

