shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हेमंत मुसरीफ यांच्या छान कविता..!!

1

बैल दिवाळी ..

सण आला पोळ्याचा 
अवस  असे  आगळी
बळीराजाच्या   घरात 
सजे आमची दिवाळी

बैल ना लेकरे  आम्ही 
आई आम्हां ओवाळी
अभ्यंग स्नान दिवाळी 
जोरात चाले आंघोळी 

शिंग  अंग  सजवलेले 
बाशींग छान  कपाळी 
तो खाई भाकर शिळी
आम्हांस  पुरण  पोळी 

झुल आम्हांस भरजरी
माया त्याची ही भोळी
बायकोच्या अंगावरती
फाटके  लुगडे   चोळी

कर्जाचा वाढता बोझा
राजाच्या  हाती झोळी
तरीही   बाप  उत्साही
ममता  भलती   खुळी

- हेमंत मुसरीफ पुणे. 
 9730306996
  www.kavyakusum.com



2
जिव्हाळा ..

घरात  करू साजरा 
रे  सर्जा राजा पोळा
क्षमा  करी  बापाला
नाही  मोठा सोहळा 

वर्षेभर करिता काम
तरीही ना ये कंटाळा 
उपकृततव ओझ्याने 
निमीत्त हे लडिवाळा 

जल्लोष न नेहमीचा
न  गाव होईल गोळा
कोरोनाचा अध्यादेश 
गर्दी  महोत्सव टाळा

अंगणात घालू स्नान
घरीचं रंगवतो बाळा
जुन्या  घुंघरू  माळा 
यंदा  घालणारं  गळा

पुरण  पोळ्या  खाता
खुले  सुखाचा  मळा 
नसेना  दृश्य  उत्सव 
कमी न हो जिव्हाळा

- हेमंत मुसरीफ पुणे. 
   9730306996
  www.kavyakusum.com

3
पोळा ..

बळीराजा  मायबाप
साजरा करतो पोळा
रोजचं जपतो आम्हां
प्रेमाचा  येई  उमाळा

जवळ येताचं  पोळा
रूपये  करितो गोळा
काढू नको  बा  ऋण
पोटा आमच्या गोळा

घासातला देतो घास
बापु  भलता  भोळा
आजारी पडता जरा
व्याकुळ होतो खुळा

नको  रंगवू  शिंगांना
नको   घुंघरू  माळा
सोयरीक कर ताईची
खर्चाला घाला टाळा

लुगडे आण आईला
धोतर  सदरा तुजला
पोळ्याहून कितीतरी
आनंद होईल मजला

- हेमंत मुसरीफ पुणे 
 ९७३०३०६९९६.
 www.kavyakusum.com

4
खरा पोळा .. 

ढवळ्या न्  पवळ्या
माझे  रे   लडीवाळा
तुम्ही असता जवळ
रोजचं असतो पोळा

अर्ध पोटी  राहूनिया
तोंड  दिलं दुष्काळा
राब राब  राबे  तुम्ही 
उपाशी राहूनि बाळा

मुके असूनि  बोलता
वाजवूनि घुंगरमाळा
पुरणपोळी ना केली 
बापाला या सांभाळा 

बाप आपला  दरिद्री 
खिसा नीत  मोकळा
डोळ्यात  पावसाळा 
नशीबामध्ये उन्हाळा

बदतीलं हे ही दिवस
येई  परत पावसाळा
सुगीच्या दिसांत त्या
करू   साजरा  पोळा

- हेमंत मुसरीफ पुणे. 
  9730306996..
 www.kavyakusum.com



close