देहरे :शिंगवे नाईक तालुका नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 10 सप्टेंबर 2021 रोजी देहरे प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या मार्फत लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. सदर लसीकरण अतिशय उत्साहात पार पडलेे.
लसीकरण कार्यक्रमादरम्यान ग्रामपंचायत सदस्य अमोल डोळस, अश्विनी ताई जाधव, महेंद्र कोळपकर, ज्येष्ठ नेते सुभाष पुंड तसेच युवानेते शुभम शेळके ,ऋषिकेश सुद्रिक, महेश दुधाळे, हे उपस्थित होते, लसीकरणासाठी गावातील आरोग्य अधिकारी बोरसे मॅडम, कुलकर्णी मॅडम, लांडगे मामा, ग्रामपंचायत लिपिक सागर डोळस, तसेच आशा कर्मचारी ताई, प्रतिभा साळवे, अनिता शिरसाट, ओंकारवती साळवे, यांचे विशेष योगदान लाभले.

