shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अभाविपच्या जिल्हासंयोजकपदी गणेश पाडेकर यांची निवड..!!



शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा प्रदेश अभ्यास वर्ग ७ व ८ सप्टेंबर रोजी बार्शी (सोलापूर) येथे पार पडला. या कार्यक्रमास राष्ट्रीय संघटनमंत्री आशिष चौहाण, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत साठे, क्षेत्रीय संघटन मंत्री  देवदत्त जोशी, प्रदेशाध्यक्ष सारंग जोशी, पश्चिम क्षेत्र सहसंघटन मंत्री रायसिंग, प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे हे उपस्थित होते. तसेच या अभ्यास वर्गात महाराष्ट्रातुन १७ जिल्ह्यातुन अपेक्षित विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचा समारोप प्रदेश संघटन मंत्री अभिजित पाटील यांनी केला.

 
या प्रदेश अभ्यासवर्गा मध्ये उत्तर पुणे जिल्हासंयोजक पदी गणेश पाडेकर यांची घोषणा करण्यात आली. यापूर्वी त्यांनी महाविद्यालयीन अध्यक्ष, जिल्हा समिती सदस्य, मागील दोन वर्ष जिल्हा सहसंयोजक अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि आता महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य अशी जबाबदारी आहे. 

त्यावेळी प्रदेश सहमंत्री अनिल ठोंबरे, पुणे विभाग संघटन मंत्री रोहित राऊत यांनी शुभेच्छा दिल्या.
close