लाखेवाडी येथे मागासवर्गीय कुटुंब करणार उपोषण व धरणे आंदोलन.
लाखेवाडी गट क्रमांक ५०६ मधील मागासवर्गीय कुटुंब यांनी तहसीलदार व इंदापूर पोलिस स्टेशन येथे लिखी सह्यांचे दिले निवेदन.
इंदापूर प्रतिनिध: इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील मागासवर्गीय कटुंबावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लाखेवाडी येथे मागासवर्गीय कुटुंबाच्या वतीने दि.१ ऑक्टोबर २०१९ रोजी उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन दि.२२ सप्टेंबर २०२१ रोजी इंदापूर तहसीलदार व पोलीस स्टेशन या ठिकाणी देण्यात आले आहे.
सदर निवेदन लाखेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ गायकवाड, दादा अर्जून पोटफोडे ,अमोल भिंगारदिवे, दत्तात्रय भिंगारदिवे, बाबू मस्के व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, आमच्यापैकी बऱ्याच लोकांना शासनाने यशवंत घरकुल व इंदिरा आवास, पंतप्रधानमंत्री आवास योजना मधून घरे बांधून दिली आहेत.तसेच गट क्रमांक ५०६ यांचे एकुण क्षेत्र ९१.२४ एकर असून त्यापैकी ४५ एकर क्षेत्र हे नऊ लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ एकर प्रमाणे १९७६ रोजी महाराष्ट्र शासनाने वाटप केले आहे.
त्याच बरोबर इंदिरा आवास, पंतप्रधान आवास योजनेतील घरे बांधण्यासाठी आमच्यापैकी बऱ्याच जणांना एक गुंठा क्षेत्र हे महाराष्ट्र शासनाने वाटप केले असून गाव नमुना सातबारा पत्रिके मध्ये आमच्या नोंदीचा समावेश आहे.
पुढे निवेदनात म्हटले आहे की १९७६ मध्ये वाटप केलेल्या नऊ खातेदारांपैकी अनेक खातेदारांनी आपल्या जमिनी या आपल्या घरगुती अडचणीमुळे व औषधोपचारासाठी विक्री केल्या असून त्याची सातबारा पत्रिकेमध्ये नोंद झाली आहे. या वाटप क्षेत्रामध्ये सहकार महर्षी साखर कारखान्याचे गट सेंटर आहे. त्याच बरोबर बाकीच्या खातेदारांच्या विक्री केलेल्या व त्यांची वहिवाट असणाऱ्या क्षेत्रावर आमच्यापैकी काही ग्रामस्थांनी त्या ठिकाणी पक्की घरे बांधली आहेत.आम्ही कोणत्याही प्रकारे शासकीय वन जमिनीमध्ये अतिक्रमण केलेले नाही.
तरीही मौजे लाखेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथिल प्रभाकर तुकाराम खाडे तसेच संतोष प्रभाकर खाडे व प्रदीप प्रभाकर खाडे या व्यक्ती आम्हाला सर्वांना मिळून ५० लाख रुपयांची खंडणी मागत आहे व न दिल्यास मी तुमची घरे उद्ध्वस्त करून टाकेल व तुमच्या कुटुंबाला बेघर करेल अशी धमकी देत आहेत तसेच सदर व्यक्ती विरोधात अनेक तक्रारींची पोलिस दप्तरी नोंद असल्याने त्यांच्यावर ती कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी तक्रार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
त्यामुळे सदर व्यक्ती कडून आमच्या सर्व कुटुंबांना जीवितास धोका असल्याने सदर व्यक्तीला तात्काळ अटक करण्यात यावी व योग्य ती कारवाई करण्यात यावी जर कारवाई झाली नाही तर आम्ही सर्व गट नंबर ५०६ मधील मागासवर्गीय कुटुंब दि.१ आक्टोंबर २०२१ पासून सकाळी १०:०० वाजल्या पासून मौजे लाखेवाडी गट क्रमांक ५०६ मध्ये विठ्ठल मंदिर या ठिकाणी उपोषण व धरणे आंदोलन करत असून याची जबाबदारी शासनाची राहील अशी मागणी मागासवर्गीय कुटुंबांनी निवेदनाव्दारे केली.

