अहमदनगर: नगर जिल्ह्यात वडार समाज मोठ्या प्रमाणात असुन हा समाज अत्यंत कष्टकरी असुन या समाजातील मजूर संस्थाना कोरोनावायरस मुळे अक्षरक्ष: उपासमारी ची वेळ आलेली आहे.
खरे तर महाराष्ट्राच्या विकासात या समाजाचे मोलाचे योगदान आहे. सिंचनाच्या सुविधा महाराष्ट्राला या समाजामुळेच मिळाल्या आहेत.अनेक धरणांच्या निर्मिती मध्ये वडार समाजाचे महत्वाचे योगदान आहे. परंतू यांचा विसर राजकारण्यांपासून सर्वांना पडलेला दिसतोय..!
या समाजाला उदरनिर्वाहासाठी मजूरी वरच अवलबुंन राहावे लागते. या समाजातील मजूर संस्थाना कामे मिळावे म्हणून भारतीय टायगर फोर्स संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ॲड योगेश गुंजाळ यांनी मुळा पाटबंधारे विभाग चे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन कामे मिळण्याची मागणी केली आहे.
हाताला काम व पोटाला भाकर मिळावे यासाठी मुळा पाटबंधारे विभागाअंतर्गत मंजूर झालेली ५०% कामे अग्रक्रमाने या वडार समाजातील मजूर संस्थांना मिळावे. मंजूर झालेली कामे न मिळाल्यास संघटनेच्या वतीने मुळा पाटबंधारे विभाग कार्यालय समोर वडार मजूराच्या बिह्राडासह गाढव घेऊन तिव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा ॲड योगेश गुंजाळ यांनी दिले.

