shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

१५ लाख रुपयाचा मुद्देमाल केवळ ७ तासात इंदापूर पोलिसांना हस्तगत करण्यात यश

१५ लाख रुपयाचा मुद्देमाल केवळ ७ तासात  इंदापूर पोलिसांना हस्तगत करण्यात
 यश .
इंदापूर प्रतिनिधी: पुणे सोलापूर महामार्गावरील सरडेवाडी येथून अपघाताचा बनावट करीत चोरून नेलेला कंन्टेनर आणि ११ लाख रुपये किमतीचे लोणचे असा एकूण १५ लाख रुपयाचा मुद्देमाल केवळ ७ तासात  इंदापूर पोलिसांना हस्तगत करण्यात
 यश आले आहे.या गुन्ह्यात मुंबई येथील ट्रान्सपोर्ट व अन्य कोणाचा हात आहे का? याबाबत सखोल तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, टाटा कंपनीचा कंन्टेनर नंबर एम .एच .०४ ई .वाय. ९०५४ हा चालक चंद्रकांत तुळशीराम कांबळे वय- ६० वर्षे रा. मिरजापूर ता.बसकल्याण जि.बिदर (कर्नाटक) हा दि.१४ रोजी विजयवाडा येथून महाशक्ती लाॅजिस्टिक ट्रान्सपोर्ट कंपनीच्या वाहनातून लिक्विड गार्लीक पेस्ट(लोणचे मसाला) घेऊन मुंबई न्हावाशेषा बंदर येथे निघाला होता.


 
त्यानंतर दि.१६ सप्टेंबर रोजी बसवकल्याण येथून त्याचा भाचा प्रशांत त्याचा मित्र श्रीनिवास चांदे व इतर एकास घेऊन मुंबईकडे निघाले. चालक चंद्रकांत कांबळे याने उजनी चा पूल ओलांडल्यावर श्रीनिवास चांदे यास वाहन चालवण्यास दिले आणि तो पाठीमागे झोपी गेला .त्यानंतर सरडेवाडी टोल नाक्यावर आणखी एक जण तु माझे गाडीस कट का मारला म्हणून गाडीत येऊन बसला.त्यानंतर काही वेळाने चंद्रकांत यास जाग आली.

जाग आल्यानंतर चंद्रकांत याने श्रीनिवासकडे हा माणूस कोण आहे याची विचारणाही केली.त्यावर त्याने तु माझे गाडीस कट का मारला म्हणून गाडीत येऊन बसला असल्याचे सांगितले. सदर वाहन हे भिगवण जवळील बील्ट या कंपनीजवळ आले असता श्रीनिवास ने वाहन थांबवले. चंद्रकांत यांना गाडीतून उतरवून मागील दरवाजा चेक कर असे सांगितले.

त्यानंतर चंद्रकांत हे वाहनाचा मागील दरवाजा चेक करण्यासाठी गेले असता वाहनातील चंद्रकांतचा भाचा प्रशांत,त्याचा मित्र श्रीनिवास व सोबतचे अनोळखी दोन असे चौघेही वाहन घेऊन पळून गेले. त्यानंतर चालक चंद्रकांत कांबळे यांनी इंदापूर पोलिस ठाण्यामध्ये शनिवारी दि.१८ सप्टेंबर रोजी रात्री १२ चे दरम्यान या घटनेबाबत वरील इसमांविरुध्द तक्रार दाखल केली.


 
चंद्रकांत कांबळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीची गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक तय्यब मुजावर यांनी सहा.पो.निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे,महेश माने,पो.उप.निरीक्षक लिगाडे व डी.बी.पथकातील अंमलदार यांची मिळून तीन पथके तात्काळ गुन्ह्याच्या शोधकामी रवाना केली. सरडेवाडी टोलनाका ते पाटस टोलनाका दरम्यानचे सर्व टोलनाके, हॉटेल,पेट्रोपंप याठिकाणचे सी.सी.टी.व्ही. फुटेज संशयित वाहने तपासणे असा सखोल तपास सुरु झाला.त्यानुसार गोपणीय माहितीच्या आधारे इंदापूर पोलीसांच्या पथकाने रावणगांव येथून चोरीस गेलेला ट्रक व मुद्देमाल सात तासाच्या आता ताब्यात घेतला आहे.


 
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डाॅ.अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर, साहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर धनवे,महेश माने,उप निरीक्षक दत्तात्रय लिगाडे,सहा. फौजदार सतिष ढवळे,पो.ना.मोहिते,मड्डी, खान,गाढवे, पोलीस शिपाई मुटेकर,यादव, गोसावी यांनी पार पाडली.पुढील तपास उप निरीक्षक दत्तात्रय लिगाडे हे करत आहेत.
close