इंदापूर खुळे चौकात कापड दुकान गीतांजली कलेक्शन चे उद्घाटन.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर खुळे चौक येथे तेजप्रुथ्वी ग्रुपच्या सस्थांपक अध्यक्षा अनिताताई नानासाहेब खरात यांच्या गीतांजली कलेक्शन या दालनाचे (दि.१७ सप्टेंबर) रोजी उद्घाटन झाले.
त्यावेळी उद्घाटनास माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, धनगर समाज नेते घनशाम बाप्पू हाके , सुरेश कांबळे , पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महिंद्र रेडके ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पांडुरंग मारकड , भाजप युवा नेते अमोलराजे इंगळे, पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव, माधुरी लडकत कृषी मार्केट चे संचालक शिवाजी इजगुडे,अशोक इजगुडे, दीपक जाधव, भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष उज्वला हाके, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे बाबासाहेब राशिनकर, तेजप्रुथ्वी ग्रुपचे अध्यक्ष राहुल नाकाडे ,महिला अध्यक्षा अर्चनाताई गोरड व इतर मान्यवर उपस्थित होते .
यावेळेस बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापुर मध्ये महिलांसाठी ज्या गोष्टीची आवश्यकता होती. ज्यासाठी खरेदीला बाहेर जावे लागे ते गीतांजली कलेक्शन मध्ये खरात परिवाराने उपलब्ध करून दिला त्यांच्या या नवीन व्यवसायास मनापासून शुभेच्छा अशा शब्दात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच घनश्याम बापू हाके म्हणाले की, जे कापड हडपसर पुणे येथे सुध्दा मिळत नाही ते गीतांजली कलेक्शन मध्ये खरात कुटुंबाने उपलब्ध केले आहे आपण इंदापूरच्या ग्राहकांना चांगली सेवा द्यावी हीच ईच्छा .
या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने, उज्वला हाके, पांडुरंग मारकड, ॲड. राहुल मखरे, महेंद्र रेडके यांनी शुभेच्छा पर विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे स्वागत गणेश शिगांडे,शिवाजी खरात,हनुमंत यमगर,सतोंष कुभांर,सोमनाथ खरात ,रूपेश वाघमोडे ,संदिपान रेडके, देविदास वाघमोडे, शुभम होलगडे यांनी केले.
तर आभार पर भाषणात नानासाहेब खरात म्हणाले की, गीतांजली कलेक्शनच्या माध्यमातून आमच्या लोकांना अतिशय सुंदर आणि खात्रीशिर कपडे देऊ आपणा सर्वांच्या मार्गदर्शन ना खाली प्रमाणिकपणे कापड व्यवसाय करून गीतांजली कलेक्शन च्या जास्तीत जास्त शाखा कशा निर्माण होतील व अनेक युवक-युवतींना कापड व्यवसायाच्या माध्यमातून कसा रोजगार निर्माण होईल यावरती भर दिला जाईल असे मनोगत व्यक्त केले.

