shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नांदेड जिल्यातिल प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार , गटविकार अधिकारी व कृषिसहाय्यक , ग्रामसेवक , तलाठी यांना सज्जावर शासना तर्फे निवासाची व्यवस्था करावी- व्यंकटराव जाधव यांची मागणी..!


नांदेड ।  प्रतिनिधी :
नादेड जिल्हातील प्रतेक तालुक्यालील तहशीलदार, गटविकास अधीकारी.अनेक तालुक्यातील जबाबदार अधिकारी तालुक्याच्या ठिकानी न राहता आपल्या सोविनुसार ये-जा करत आहेत, व कृषिसहाय्यक , ग्रामसेवक , तलाठी सज्जाच्या ठिकाणी राहात नाहीत. खेडयामध्ये निवासाची व्यवथा होत नसल्या मुळे ते शासनाचे घर भाडे घेऊनही शहरामध्ये म्हणजेच तालुक्यांच्या ठिकाणी सर्रासपणे राहातात, ही वस्तुस्थिती आहे. 

शेतक-यांना कृषि सहाय्यक शेतावर व गावात येवुन कृषिसल्ला देत नाहीत व ग्रामसेवक आणि तलाठी देखिल वेळेवर भेटत नाहीत यामुळे जनतेची गैर सोय होत आहे. त्यामुळे शासना तर्फे निवासाची व्यवस्था करुन ग्रामीण भागातील जनतेची गैर सोय थांबवावी. अशी मागणी माहिती अधिकार तपास समिती मराठवाडा उपाध्यक्ष व्यंकट जाधव. पांडुरंग कंधारे. माधव वडजे. मामडे गिरीश यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
close