प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज शहरासह तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू असून त्यामुळे परिसरातील शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचुन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे पंचनामे करून तात्काळ मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे
सततच्या पावसामुळे शहरातील आणि परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटल्यामुळे महसूल प्रशासनाच्या वतीने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे
रोजच दुपारी पावसाला सुरुवात होते . रोजच्या पावसाने अनेक गावातील शेतामध्ये सर्वत्र पाणीच पाणी साचते. जोरदार असलेला पाऊस दुपारभर कधी रात्री असतोच . त्यामुळे केजडी व तालुक्यातील इतर नद्यासह तलाव,बांधारे, ओढे,तुडूंब भरले आहेत. मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे
तालुक्यातील बऱ्याच ठिकाणची वाहतूक बंदआहे .शहराच्या अनेक भागातील रस्त्यावर,वस्ती भागात पाणी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरासह परिसरातअनेक ठिकाणी वाहने थांबलेली असतात. मंगळवारी दुपारून पाऊस चालूच होता तो रात्रीही तसाच चालू होता. मध्यतंरी तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन, मुग, उडीद या पिकांना मोठा फटका बसला असून सखल भागांमध्ये पाणी साचल्याने बऱ्याच शेतातील सोयाबीन पिके बुडून गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाच्या वतीने सूचना दिली जात आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने केज शहरासह तालुक्यातील परिसरात पिकांचे विमा कंपनी, महसूल आणि कृषी विभागाने एकत्र पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा द्यावा अशी मागणी केज तालुक्यातील बळीराजा कडून मोठ्या प्रमाणात होत आहे.
सततच्या होत असलेल्या पावसाने हातातोंडाशी आलेले सोयाबीन व इतर पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यातच सोयाबीनचे भाव पडले आहेत त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने शेतकऱ्यांना तातडीने मदत केली तरच शेतकरी या संकटातून सावरू शकतो. मनोज भगवान मुळे व अच्युत निव्रती बिक्कड शेतकरी.



