प्रतिनिधी : रफीक शेख
पारनेर : २३ / कोणत्याही कामाचे भुमिपुजन शासकिय प्रोटोकॉलप्रमाणे करावे लागते. त्यावेळी सबंधित खात्याचे अधिकारी, ठेकेदार उपस्थित असावे लागतात. उद्या कोणीही उठेल व भुमिपुजन करेल आणि काम सुरू झाले नाही म्हणून उपोषणाचा इशारा देईल याला काहीच किंमत नसल्याचे सांगत आमदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजुर झालेल्या कामांचे भुमिपुजन शासकिय प्रोटोकॉलप्रमाणे, मंत्र्यांच्या उपस्थितीत होईल व त्यानंतरच कामे सुरू होतील. सध्या रस्त्याच्या बाजूच्या झाडांची साफसफार्ई सुरू आहे. त्याला काम सुरू झाले असे कसे म्हणता येईल ? असा टोलाही आ. लंके यांनी मारला.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजुर झालेल्या रस्त्यांच्या कामांना आपल्या काळात मंजुरी मिळाली होती. त्यासाठी आपण पाठपुरावा केला होता. आता त्या कामांसाठी निधी मंजुर झाल्याने या कामाचे श्रेय आपलेच आहे. त्यामुळे या कामांचे भुमिपुजन करण्याचा अधिकार आपलाच असल्याचा दावा करून विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी विविध कामांचे भुमिपुजन करीत "या कामांमध्ये कोणी खोडा घातला तर आपण सर्वांचे बाप आहोत" असा इशारा दिला होता. औटी यांनी कामांचे भुमिपुजन केले खरे, मात्र दोन महिने उलटले तरी त्यांचे कामच सुरू झाले नव्हते. त्यामुळे काशिनाथ दाते व विकास रोहोकले यांनी कामे सुरू न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावर मुख्यंमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांनी काही कामे सुरू झाली असून काही कामे आठ दिवसांत सुरू करण्यात येणार असल्याचे अश्वासन दिले होते.
आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कामे सुरू झाल्याचा दावा दाते व रोहोकले यांनी केल्यानंतर आ. नीलेश लंके यांनी त्यास स्वतः प्रत्युत्तर देत कोणत्याही कामाचे भुमिपुजन शासकिय प्रोटोकॉलप्रमाणे करावे लागते. त्यावेळी सबंधित खात्याचे अधिकारी, ठेकेदार उपस्थित असावे लागतात. उद्या कोणीही उठेल स्वतःच्याच पैशाने भुमिपुजन करेल व काम सुरू झाले नाही म्हणून उपोषणाचा इशारा देईल याला काहीच अर्थ नसल्याचे ते म्हणाले.
मी काम मंजुर केल्याचा कोणीही दावा केला तरी त्याला निधी कोणाच्या काळात मंंजुर झाला ? अर्थमंत्री कोण आहे ? याची माहीती विरोधकांनी घ्यावी. शासकिय प्रोटोकॉलप्रमाणे सबंधित लोकप्रतिनिधी, त्या खात्याचे अधिकारी, ठेकेदार त्यावेळी उपस्थित असणे बंधनकारक असते. असे काहीही नसताना स्वतःच नारळ फोडून कोणी स्वतःची पाठ थोपटून घेणार असेल तर तालुक्यातील जनता दुधखुळी नाही याची जाणीव ठेवण्याचा सल्ला आ. लंके यांनी दिला आहे.
मंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी सफाई ! त्याचीच काम सुरू झाले म्हणून बतावणी !
या रस्त्यांच्या भूमीपूजनासाठी मंत्री महोदय येणार आहेत. प्रोटोकॉलप्रमाणे त्यांच्या स्वागताची तयारी सुरू झालेली असताना काम सुरू झाल्याचा दावा करणे हास्यास्पद असल्याचे आ. लंके म्हणाले.

