शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा राहुरी तालुका प्रतिनिधी दिपक हरिश्चंद्रे.
राहुरी : राहुरी तालुक्यासह , नेवासा, पारनेर आणि अहमदनगर शहरांची तहान भागवण्यासाठी तसेच लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचे वरदान ठरणारे मुळा धरणातून पाणी सोडण्यात आलं आहे. आज धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले. मुळा धरणात ९९.५६ टक्के धरणाचा पाणीसाठा झाला. काल रात्री ११ दरवाजे उघडून २१७० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. आज सकाळी कोतूळजवळ मुळा नदीचा विसर्ग १५१३ क्युसेक होता. आवक कमी व पाणी सोडले जास्त, अशी स्थिती आहे. हे असं का केलं, याचं उत्तर मिळत नाही. कारण आज कालच्या पेक्षा पावसाचा जोर कमी आहे. या शिवाय मुळा धरणात भंडारदरा धरणाच्या तुलनेत पण्याची आवक कमी आहे. गेल्या २४ तासांत भंडारदरा धरणात १४९ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. मुळा धरणात मात्र हीच आवक फक्त ८९ दशलक्ष घनफूट आहे. या वर्षी धरणात एकूण १७ हजार ७३४ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली.रतनवाडीत ५३ मिलिमीटर पाऊस भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंगळवार प्रमाणेच आहे.
मुळा नदी पात्रात जायकवाडी कडे पाणी सोडले जात आहे. हे अकरा दरवाजातून पाणी सोडतानाची तिरंगी रंगांची विद्युत रोषणाई आकर्षित करत आहे
जेष्ठ नेते व माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या संकल्पनेतून तिरंगी रंगांची विद्युत रोषणाई करण्यात आली मूळा धरण अर्थातच ज्ञानेश्वर सागर या धरणाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा म्हणून पाटबंधारे विभाग यांना तसे आदेश देण्यात आले होते. या संकल्पनेतून तिरांगी रंगछटा करण्यात आली. ह्या विद्युत रोषणाईच्या असलेल्या विवीध रंगछटा चे विहंगम दृष्य या परीसरात येण्यासाठी जणुकाय ईशाराच करत आहे की काय. या भागातील अनेक नागरिकांना हे विलोभनीय दृश्य पाहण्याचा मोह न आवरल्यामुळे या परिसरात गर्दी देखिल केली होती.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर येथे २९, रतनवाडी ५३, पांजरे २७, भंडारदरा धरण २३, वाकी १९ मिलिमीटर अशी नोंद झाली. निळवंडे धरणाच्या परिसरात २५, तर अकोले परिसरात ४२ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. मुळा धरणाच्या परिसरातही ७ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. या शिवाय संगमनेर २४, आश्वी ३, ओझर (बंधारा) ३०, श्रीरामपूरमध्ये २ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.भंडारदरातून कालव्यांचा विसर्ग घटवलाभंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस असला, तरी धरणातून दररोज नियमितपणे होत असलेल्या ८१६ क्युसेक विसर्ग तसाच ठेवण्यात आला आहे. पण कालव्यातून ६०१ एवजी ३५४ क्युसेकनं पाणी सोडण्यात येत आहे. धरणाचा पाणीसाठी पुन्हा पूर्ण १०० टक्के झाला आहे. निळवंडे धरणातून सर्व मिळून आता २३०१ क्युसेकनं पाणी सोडण्यात येत आहे.इतर धरणांची स्थितीभंडारदरा – ११०३९ दशलक्ष घनफूट- १०० टक्केनिळवंडे –८३२० दशलक्ष घनफूट- १०० टक्केआढळा – ९३६ दशलक्ष घनफूट – ८८.३०भोजापूर – १७५ दशलक्ष घनफूट – ४८.४८ टक्केमांड ओहोळ – १५१.८० दशलक्ष घनफूट – ३८.०४ टक्केघाट पारगाव – ४३७ दशलक्ष घनफूट – १०० टक्के सीना – २०७८ दशलक्ष घनफूट – ८६.५९ टक्केखैरी – ५३३ दशलक्ष घनफूट – १०० टक्केविसापूर – ६९.०० दशलक्ष घनफूट – ७.६७ टक्के जायकवाडी धरणा – ८३.४७१९ टीएमसी- ८१.२५ टक्के (उपयुक्त ७४.८९ टक्के)

