shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण (५) "कदंबाचे झाड "



हा वृक्ष मराठीमध्ये नीव, हिंदीमध्ये कदम, संस्कृतमध्ये कदंबा आणि इंग्रजीत Laran, Kedam या नावाने ओळखला जातो. हा वृक्ष Rubiaceae कुळातील आहे. 

उंचच उंच वाढणारा व आडव्या फांद्या लांबच लांब, सदाहरित, भरपूर व दाट सावली देणाऱ्या या वृक्षाची साल, मूळ व फळे औषधी आहेत. 

कदंबाच्या सालीचे चूर्ण, काढा  यांचा उपयोग जखमा लवकर भरून येण्यासाठी, रक्तविकार, गर्भाशयाच्या तक्रारी, उन्हाळ्यामुळे होणारा त्रास टाळण्यासाठी, शरीरातील विष बाहेर काढण्यासाठी, पित्ताच्या तक्रारी, जळजळ, वारंवार होणारी बहुमूत्रता यावर उपयोगी आहे. विशेष म्हणजे लहान मुलांची टाळू भरून येण्यासाठी कदंबाच्या सालीचा रस  टाळूवर, कपाळाला लावावा. कदंबाची फळे व साल कामोत्तेजक, स्तंभक असून ताप, कफ, व्रण, विष आणि वायू यांचा नाश करण्यास उपयुक्त आहे. कदंब वृक्ष श्रीकृष्णास अत्यंत प्रिय म्हणून या वृक्षाचे धार्मिक महत्त्व आहे.

कदंब वृक्षाचे औषधी गुणधर्म लक्षात घेता या झाडाची ओळख करून घेणे आवश्यक आहे. कारण हे झाड सर्वत्र विपुल प्रमाणात आढळून येते. ज्याचा उपयोग आपण दैनंदिन आरोग्यरक्षणात करू शकतो. कदंब वृक्ष पर्यावरण पोषक, आरोग्यरक्षक असून या वृक्षाची माहीती आपल्या मित्रपरिवारास देऊन कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या पर्यावरण साक्षरतेच्या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी व्हावे. निरोगी आरोग्य, निरोगी समाज, निरोगी राष्ट्र निर्मिती हीच राष्ट्रभक्ती होय.

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या विद्यमाने पर्यावरण जनजागरण मोहिमेंतर्गत प्रसारित लेखक :चंद्रकांत शहासने, निसर्गोपचारक.पुणे.
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
close