shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुक्यातील तलाव तात्काळ भरून घ्या.. इंदापूर तालुका राष्ट्रीय समाज पक्षाने निवेदन देऊन केली मागणी.

  इंदापूर  तालुक्यातील तलाव तात्काळ भरून घ्या.. इंदापूर तालुका राष्ट्रीय समाज पक्षाने निवेदन देऊन केली मागणी.

इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने खडकवासला कालवा विभाग इंदापूरच्या कार्यकारी अभियंता यांना खडकवासला प्रकल्पातील सांडव्यातील पाणी इंदापूर तालुक्यातील तलावांमध्ये सोडण्याबाबतचे निवेदन पत्र (दि १४ सप्टेंबर) रोजी देण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे इंदापूर तालुका प्रभारी सतीश नाना तरंगे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश दादा शिंगाडे, इंदापूर शहर अध्यक्ष श्रीनिवास सातपुते, गणेश हेगडकर, विश्वास कोळेकर, सोन्या जानकर ,सोमनाथ कोळेकर, पप्पू चोरमले इत्यादी उपस्थित होते.

 इंदापूर तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने उपविभागीय  कार्यकारी शाखा अभियंता  प्रशांत हराळे  यांना निवेदन देण्यात आले. 
 खडकवासला  प्रकल्पातील ओव्हरफ्लो धरण साखळी तील सर्व धरणे व खडकवासला प्रकल्प १०० टक्के भरला असल्याकारणाने धरणाचे ओव्हरफ्लो पाणी इंदापूर तालुक्यातील मदनवाडी, भादलवाडी, पळसदेव, तरंगवाडी, गागरगाव (बळपुडी) हे तलाव कोरडेठाक पडलेले आहेत .इंदापूर तालुक्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे .तरी हे तलाव तात्काळ भरून घेण्यात यावे अशी मागणी इंदापूर तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली असता  प्रशांत हराळे शाखा अभियंता यांनी  विराज परदेशी सहाय्यक अभियंता यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क साधला असता  परदेशी यांनी  सतीश तरंगे यांना इंदापूर तालुक्यातील सर्व तलावा मध्ये पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
close