माझी नगर पालिका,परकी झालीका ?
-----------------------------------------
शहर परिसरात वाढलेले गवत आणि
पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेले खड्डे !
शहराच्या रोगराईसाठी कारणीभूत ठरत
आहेत डास आणि मच्छरांचे आड्डे !!
नगर पालिका प्रशासनाने गवत काढावे,खड्डे भरावे,दाखवावा थोडा कर्तव्यदक्षपणा !
नागरी समस्यांच्याप्रती आपले काही देणे,
भान याचे किमान जरासे तरी जाणा !!
फैलावू नये ताप,थंडी, फ्ल्यू, मलेरिया
अशा प्रकारे भयंकर साथीचे आजार !
पहिलेच कोरोना लॉकडाऊनमुळे रित्या
खिश्याने नागरीक झाले भलतेच बेजार !!
तुम्हाला निवडून दिले सेवा करण्यासाठी,
मग नागरीकांची सेवा कधी तुम्ही करणार ?
आपल्या सेवेला मुहूर्त सापडेपर्यंत येणारी
संभाव्य रोगराई दम कशी धरणार ?
अशा भयानक संकटसमयी,संकट
निवारणासाठी धाऊन येण्याची वेळ आली !
मात्र माझ्या न्याय हक्काची माझी नगर पालिका,आज का म्हणून परकी झाली ?
सध्या प्रत्येक घरातील आजारी व्यक्ती,
आजारापणामुळे रुग्णालयात जात आहे,
नगर पालिका प्रशासन कधी घेईल दखल,
याची सारखी आतुरतेने वाट पहात आहे !!
शब्द रचना : शौकतभाई शेख
श्रीरामपूर- मोबा.९५६११७४१११.

