shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी तालुक्यातील अवैध दारु विक्री करणाऱ्यांच्या विरोधात खाकी वर्दीची कडक कारवाई..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा राहुरी तालुका प्रतिनिधी दिपक हरिश्चंद्रे.

 राहुरी,दि.२७ सप्टेंबर,(प्रतिनिधी) –  तालुक्यात अवैध दारू विक्रेत्यांविरोधात पोलीस निरिक्षक राजेंद्र इंगळे यांनी धडक कारवाईचा विडा उचलला असल्याने या व्यावसायिकांचे धाबे दणानले आहेत. आंबी येथे बऱ्याच दिवसापासून सुरू असलेल्या गावठी दारु विक्रेत्यांकडून जवळपास ३९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
         यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली की, आंबी गावाचे शिवारात गांधीवाडी अंमळनेर येथे दिलीप सुर्यभान गुंजाळ, शोभा अशोक गुंजाळ, शोभा अर्जुन गुंजाळ हे त्यांच्या राहत्या घराच्या आडोशाला स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी गावठी हातभट्टी दारू विक्री करीत आहेत. सदरच्या माहितीनुसार पोलीस निरिक्षक राजेंद्र इंगळे  यांचे मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी छापा मारण्याकामी २ पंच, व पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकत तब्बल २१० लीटर गावठी दारु तसेच २८० लीटर गावठी दारू तयार करण्यासाठीचे कच्चे रसायन असा एकूण ३९ हजार रुपये कीमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरच्या विक्रेत्याविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात मुंबई कायदा कलम ६५ (फ)(क)(ड)(ई) प्रमाणे वेगवेगळे गुन्हे दाखल केले असून अधिक तपास पोलीस निरिक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रभाकर शिरसाठ व भिताडे करीत आहेत. 
         सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीरामपूर दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. राहुरीला रुजू झाल्यानंतर पोलीस निरिक्षक राजेंद्र इंगळे यांनी अवैध धंद्याविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश कर्मचारी वर्गाला दिले असून तालुक्यातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. अश्या प्रकारचे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करून तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था  अबादीत राखण्यासाठी वेळोवेळी कार्यवाही सुरू ठेवावी. अश्या प्रकारची मागणी संपुर्ण तालुक्यातील जागरूक नागरिकांमधून होत आहे.

Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (राहुरी- तालुका प्रतिनिधी )📲7350591600

close