महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिले क्रीडा संकुल अंथुर्ने येथे - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.
अंथुर्ने येथे क्रीडा संकुल मैदानाचा भूमिपूजन समारंभ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी:महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिले क्रीडा संकुल अंथूर्ण्यात होत असून या क्रीडा संकुलाचा वापर करून लोकांनी आपले आरोग्य सुदृढ ठेवावे. असे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अंथुर्ने येथील क्रीडा संकुल मैदानाचे भूमिपूजन समारंभा वेळी व्यक्त केले.
इंदापूर तालुक्यातील अंथुर्ने गावात जिल्हा नियोजन समिती पुणे अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून व क्रीडा विभाग यांच्या वतीने ४०० मीटर धावन मार्ग, कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल ,क्रिकेट पिच या मैदानाचा भूमिपूजन समारंभ राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते (१८ सप्टेंबर) रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य-प्रताप पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, छत्रपती कारखान्याचे संचालक लक्ष्मणराव शिंगाडे ,पंचायत समिती सदस्य सारिकाताई लोंढे, सागर (बाबा) मिसाळ,राजेश बागुल, तात्याराम शिंदे, माजी उपसरपंच भरणेवाडी आबासाहेब भरणे, सरपंच अंथूर्ने लालासाहेब खरात, सरपंच भरणेवाडी स्वातीताई भरणे , क्रीडा अधिकारी इंदापूर महेशकुमार चावले, उपसरपंच अंथूर्ने गणेश शिंदे, उपसरपंच भरणेवाडी विजया मस्के तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ अंथूर्ने व भरणेवाडी गावातील उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी अंथुर्णे येथील ग्रामीण भागातील महाराष्ट्रातील पहिले क्रीडा संकुल होत आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना क्रीडा संकुलाच्या माध्यमातून चांगले व्यासपीठ मिळणार आहे. या मधून चांगले यशस्वी खेळाडू घडावेत. तसेच या क्रीडा संकुलाचा वापर करून लोकांनी आपले आरोग्य सुदृढ ठेवावे. या ठिकाणच्या मल्टीपर्पज हॉलचे काम लवकर चालू होईल. असे राज्यमंत्री भरणे यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक इंदापूर तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांनी केले. सूत्रसंचालन अमोल धापटे यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल साबळे यांनी केले.

