-----------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
मागील दशकात देशात धुमाकूळ घालत असलेला अंतराष्ट्रीय गुन्हेगार शोभराज हा कुख्यात होता. तो अनेकांना खाद्यपदार्थ खायला देऊन फसवत होता. तसाच एक ठक केज आणि परिसरातील वृद्ध नागरिकांना हेरून त्यांना प्रसादाचा पेढा बिस्कीट चहा किंवा पिण्यास शीतपेय देऊन त्यांची लुबाडणूक करणारा ठक म्हजनेच छोटा चार्लस शोभराज उर्फ माणिक सिरसट यास केज पोलिसांनी मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या
केज तालुक्यातील आरणगाव येथील माणिक उर्फ बंडू त्रिंबक सिरसट याने अनेकांची ओळख काढून वेगवेगळे अमिश दखऊन; तर कधी प्रसादाचा पेढा खायला देऊन कधी बिस्कीट तर कधी शीतपेये प्यायला देऊन त्यात गुंगी आणणारे औषध मिसळून गुंगी आल्यास त्यांच्याकडील रोख रक्कम व सोने आणि दागदागिने काढून घेतल्याचे सहा गुन्हे केज पोलीस ठाण्यात त्याच्यावर दाखल आहेत. माणिक उर्फ बंडू सिरसट हा फोन वापरत नव्हता. तसेच गुन्हा केल्यास तो तिर्थ क्षेत्रात जाऊन राहत असे. तो मोबाईल बाळगीत नव्हता म्हणून त्याचे मोबाईल लोकेशन मिळणे अवघड होते. तसेच तो त्याचा राहण्याचा ठावठिकाणा वारंवार बदलत असे .म्हणून त्याचा तपास घेऊ त्याला अटक करणे हे पोलिसांना आवाहन होते. मात्र केज पोलिसांनी
माणिक सिरसट हा त्याच्या मूळ गावी आरणगाव येथे आला असल्याची माहिती गुप्त खबऱ्या मार्फत मिळताच त्याची सर्व गुप्तता पाळून दि. १२ सप्टेंबर रोजी प्रभारी पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्ष महादेव गुजर, डीबी पथकाचे दिलीप गित्ते, पोलीस नाईक अमोल गायकवाड व अशोक गवळी हे त्याच्या घराभोवती पोलीस दबा धरून बसले. कारण त्याला किंवा त्याच्या बायका पोरांना पोलिसांचा संशय आला तर ते पोलिसांना अडथळा निर्माण करतील व त्याचा फायदा घेऊन तो पसार होण्याची शक्यता होती; म्हणून पोलिसांनी त्याची पत्नी आणि मुलगा घरा बाहेर जाताच आतल्या खोलीत लपून बसलेला माणिक उर्फ बंडू सिरसट याला अलगद ताब्यात घेतले.
दि. १३ सप्टेंबर रोजी ठक माणिक उर्फ बंडू सिरसट यास केज न्यायालयात हजर केले असता त्याला दि. १६ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
माणिक सिरसाट याच्या नावे केज पोलिसांत दाखल असलेले गुन्हे :-
----------------------------------------------------
१)
गु र नं ६६/२०२१ दि ९/२/२०२१
मुलीचे लग्न जमविण्यासाठी सोबत चला असे म्हणून मारुती कराड तांबवा यांना गुंगीचे औषधी देऊन एका वृद्धाच्या हातातील अंगठी व रोख दहा हजार रु. लुटल्या प्रकरणी सराईत ठकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
---------------------------------------------------------------
२)
केज येथे एका सेवा निवृत्त शिक्षका त्रिंबक घुले, टाकळी यांना गुंगीचे औषध खायला देऊन हातातील सोन्याच्या अंगठ्या व रोख रक्कम असा ४२ हजार रु. चा ऐवज लंपास केला आहे.गु र नं ३७१/२०२१ हा गुन्हा दाखल झालेला आहे.
-----------------------------------------------------------
३)
केज येथील छाया मुकुंद वाकळे रा. केज यांना दि. २४/८/२०२० रोजी प्रसादाच्या पेढ्यात गुंगीचे औषध टाकून तो प्रसाद म्हणून खायला देऊन गळ्यातील मंगळसूत्र व कानातील सोन्याचे टॉप्स काढून घेतले. त्या प्रकरणी माणिक सिरसाट याच्यावर केज येथे गु र नं ४०९/२०२१ दाखल आहे
---------------------------------------------------------
४)
दि. १७/१/२०२० केज येथे महादेव नाना तांदळे रा कोरेगाव यास माणिक सिरसाट म्हणाला की, माझ्या मुलीची सोयरीक आहे. असे म्हणून चहा पाजून केळी व पान खाण्यास देत एका सत्तर वर्षीय महादेव नाना तांदळे, रा कोरेगाव या वृद्धास अनोळखी इसमाने नगदी रु. ३० हजार रु. व दहा ग्रॅम सोन्याची अंगठी असे एकूण ५५ हजार रु. ला फसवणूक केली. या प्रकरणी त्याच्यावर केज पोलीस ठाण्यात गु र नं १६/२०२० नुसार गुन्हा दाखल आहे.
------------------------------------------------------
५)
सन २०१८ मध्ये भाटुंबा येथील एका वृद्धाला तुमचे वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मंजूर करून अनुदानाची पगार सुरू करतो म्हणून ३० हजार रु घेतले होते त्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गु र नं २८०/२०१८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
------------------------------------------
६ )
सन २०१७ मध्ये माणिक सिरसाट याने गुरुवार रोजी साळेगाव येथील आठवडी बाजारात म्हैस खरेदी करण्यासाठी आलेल्या श्रीमती जोगदंड रा. सोनिजवळा ता. केज हिला तुमची पगार करतो असे म्हणून ३०० हजार रु लुबाडणूक केली होती.त्या प्रकरणी माणिक सिरसाट याच्यावर केज पोलीस ठाण्यात गु र न ४२५/२०१७ गुन्हा दाखल आहे.
--------------------------------------------------------


