shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आम्ही पक्षाचे समर्थक नाही, आम्ही जनतेचे समर्थक आहोत - ॲड. राहुल मखरे.

आम्ही पक्षाचे समर्थक नाही, आम्ही जनतेचे समर्थक आहोत -  ॲड. राहुल मखरे.

इंदापूर प्रतिनिधी: बहुजन मुक्ती पार्टीची सत्ता आल्यावर समाजाच्या समस्या सोडविण्याचे, समाजाच्या हिताचे बोलण्याचा आणि समाजाच्या हिताचे निर्णय घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य लोकप्रतिनिधींना देण्यात येईल. कारण आम्ही पक्षाचे समर्थक नाही, आम्ही जनतेचे समर्थक आहोत. असे प्रतिपादन बहुजन मुक्ती पार्टी चे राष्ट्रीय महासचिव ॲड. राहुल मखरे यांनी बहुजन मुक्ती पार्टी इंदापूर तालुका कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये उपस्थित हजारो कार्यकर्त्यांना संबोधित करताना लासुरणे येथे स्पष्ट केले.
इंदापूर तालुक्यातील लासुरणे येथे बहुजन मुक्ती पार्टी चा भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटक नंदकुमार थोरात (माजी जिल्हा परिषद सदस्य), श्रीकांत ओहोळ प्रदेश (अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र राज्य), ॲड. राहुल मखरे (राष्ट्रीय महासचिव बहुजन मुक्ती पार्टी), अमोल लोंढे (पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष युवा आघाडी), पांडुरंग रायते (शेतकरी संघटना), बाबासाहेब भोंग (इंदापूर तालुका अध्यक्ष), पोपट आठवले (कार्याध्यक्ष इंदापूर तालुका),राहुल शिंगाडे (इंदापूर तालुका युवक अध्यक्ष), काजल उकिरडे (तालुका महिला अध्यक्ष ),संतोष शिरसागर( इंदापूर शहराध्यक्ष). संतोष कांबळे, विष्णू चव्हाण, नेताजी लोंढे, संजय डोनाल्ड शिंदे व बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय भाषण करताना अॅड. राहुलजी मखरे यांनी काँग्रेस, भाजप व तत्सम पक्षातून निवडून गेलेले प्रतिनिधी हे समाजाच्या मतावर निवडून गेले असले तरी ते समाजाच्या हितासाठी काम करत नाहीत. कारण त्यांना पक्षाने तिकीट दिलेले असते. पक्षाचे अजेंडे समाजविरोधी आहेत हे माहीत असले तरी ते पक्षाचे विरोधात जाऊन समाजहिताचे निर्णय घेऊ शकत नाहीत. 

कारण पुढील निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारली जाईल अशी भीती असते. पक्ष जे सांगेल ते काम सालाने ठेवलेल्या गड्यासारखे करायचे,एवढीच त्यांची भूमिका असते. परंतु, बहुजन मुक्ती पार्टीची सत्ता आल्यावर समाजाच्या समस्या सोडविण्याचे, समाजाच्या हिताचे बोलण्याचा आणि समाजाच्या हिताचे निर्णय घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य लोकप्रतिनिधींना देण्यात येईल. कारण आम्ही पक्षाचे समर्थक नाही, आम्ही जनतेचे समर्थक आहोत. त्यामुळे आमच्या पक्षाचे ब्रीद "जनतेची... जनतेद्वारा... जनतेसाठी" असे आहे, असे ते म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष श्रीकांत  होवाळ यांनी  ओबीसी आरक्षणावर बोलताना म्हणाले की, काँग्रेस आणि भाजप हे ओबीसींच्या आरक्षणाच्या विरोधात आहे. जर त्यांना आरक्षण द्यायचे असते तर यापुर्वीच दिले असते. परंतु, हे ओबीसींना आरक्षण विषयी चुकीची माहिती देऊन त्यांच्या मधे आरक्षण विषयी गैरसमज पसरवत आहेत.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे लोकसभा प्रतिनिधि महाराष्ट्राच्या बाहेर नाहीत, शिवसेनेचे नाहीत. त्यामुळे संसदेत यांचा प्रभाव पडत नाही. पुरोगामीत्वाची कातडी पांघरूण बहुजन समाजाला फसवण्याचे काम या पक्षांकडून होत आहे. बहुजन मुक्ती पार्टीची देशात सत्ता आली तर लोकसंख्येच्या प्रमाणात १०० टक्के आरक्षण लागू करण्यात येईल. असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाप्रसंगी, नंदकुमार थोरात, अमोल लोंढे, पांडुरंग रायते, बाबासाहेब भौंग, राहुल शिंगाडे, इतर काही मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय डोनाल्ड शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष कांबळे यांनी व्यक्त केले.
close