केज तालुक्यातील आदर्श शिक्षक व प्राध्याकांचा केला सन्मान..!!
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज तालुक्याच्या ग्रामिण भागात बरेच शिक्षक प्रामाणिकपणे सेवा देण्याचे काम करतात.ई -लर्निंग व अत्याधुनिक तंञज्ञानाचा वापर करुन अनेक विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरच्या परिक्षा उत्तीर्ण होवुन,स्काॕलरशिप मिळवणे हा सोपा प्रवास नाही.विद्यार्थी ,पालक व शाळेतील शिक्षक यांच्या मेहनतीचे हे मधुर फळ आहे असे प्रतिपादन दयानंद प्रतिष्ठाण चे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केले.ते केज येथील जीवन विकास शिक्षण मंडळ व दयानंद प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यामाने आदर्श शिक्षक सोहळ्यात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की आदर्श पुरस्कारामुळे शिक्षकाला प्रोत्साहन मिळुन त्यांची जबाबदारी वाढते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी दयानंद प्रतिष्ठाण चे सचिव जी.बी.गदळे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये जीवन विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अंकुशराव इंगळे,फजिलोद्दीन काजी,नारायणराव अंधारे,प्रकाश कोकीळ ,गणेश कोकीळ व मुख्याध्यापक बी.व्ही.गोपाळघरे हे होते.
या कार्यक्रमात केज तालुक्यातील निवडक शिक्षकाला आदर्श पुरस्कार देण्यात आले त्या मध्ये जि.प.शाळेचे अशोक जोगदंड,प्रकाश टोपे व शंकर तारळकर यांना तर स्वामी विवेकानंद मंदीरचे संदिप शेंडगे,सुरेखाताई डांगे व
राजर्षी शाहु मंदिराचे जयपाल मस्के यांना वितरीत करण्यात आला.
याच कार्यक्रमात केज शहरातील नव्या पीएच.डी.धारक प्राध्यापक डॉ .कविताताई गीते,डॉ.बी.जे.हिरवे व डॉ.सीताताउ केंद्रे यांना ही आदर्श प्राध्यापक म्हणुन सन्मानित करण्यात आले. याच कार्यक्रमात एन.एम.एम.एस.अंतर्गत सह शिक्षक बी.एम.टिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली 48000 रुपयाची शिष्यवृती मिळालेल्या मंथन चौरे,रोहीणी बारगजे,साक्षी घुले,परमेश्वर पाळवदे,समाधान गीते ,शेखर हजारे या विद्यार्थ्यांचांही सत्कार करण्यात आला .
अध्यक्षीय समारोपात जी.बी.गदळे यांनी आजच्या काळात आदर्श शिक्षक शोधणे हे अवघड काम आहे असे सांगितले.तरी ही काही आदर्श शिक्षक ही शिक्षण व्यवस्थेची कमान सांभाळत आहेत.ग्रामिण भागातील समस्यांना पार करत शिक्षकांनी ज्ञानदानाचे काम करुन दिलेला आदर्श पुरस्कार सार्थ ठरवावेत.
कार्यक्रमाचे काव्यमय सुञ संचलन कवीवर्य ह.ब.घाडगे यांनी तर आभार मुख्याध्यापक गोपाळघरे यांनी व्यक्त केले.

