प्रमोद चौधरी
एरंडोल/जिल्हा प्रतिनिधी
एरंडोल :-भारतीय राष्ट्रीय युवा परिषद एरंडोल तर्फ आज 18 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील आदर्श व गुणवंत शिक्षकांचा सन्मान कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येक शिक्षकांच्या घरी जाऊन सन्मानपत्र देऊन शिक्षकांना सन्मानित करून पार पडला.त्यात आजच्या ह्या कठीण परिस्थिती ही आपल्या शिक्षकांनी ज्ञानर्पण करण्याचे काम चोख बजावले आहे. आपण शाळेत जाऊ शकलो नसलो तरी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आज आपल्या घराघरात पोहोचले
अशा ह्या निर्मळ आणि निरपेक्ष भावनेला सलाम म्हणून आज आदर्श शिक्षक सन्मान कार्यक्रम घेण्यात आला. ह्या वेळी प्रदीप वसंतराव मोरे,विजय एकनाथ पाटील,राकेश सुभाषराव साळुंखे,ज्योती यशवंत भामरे,मनीष अशोकराव मोरे,शेख इमरान शेख हैदर,प्रमोद पाटील (चिलानेकर),मधुकर नंदलाल कपाटे,नरेंद्र भीमराव गायकवाड,जोत्सना संभाजीराव साळुंखे ह्या शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले.
त्याबरोबर सदर कार्यक्रमासाठी भारतीय राष्ट्रीय युवा परिषद एरंडोल तालुक्यातील जिल्हा समन्वयक सागर महाजन तालुका उपाध्यक्ष राकेशसिंग राजपूत तालुका मुख्यसचिव तुषार माळी सचिव चेतन पाटील,तसेस एरंडोल तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.

