shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सोनईत परस्पर विरोधी गुन्हे दाखल, सोनई - घोडेगाव रोडवरील घटना .!


प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई:- घोडेगाव रोडलगत असलेल्या एकमेकांच्या शेजारी राहत असणारे जागेच्या कारणावरून वाद चालू असून कैलास पोपट अनारसे हे आरोपींना वाकुल्या दाखवतात, या कारणांचा राग मनात धरून सीताराम रंगनाथ रैदळ,सुधा बाई सीताराम दिने,स्नेहल सिताराम रौदळ, राजेंद्र मारोती अनारसे,संगीता अनारसे, अमृता अनारसे, रा.घोडेगाव रोड,यांनी रात्रीच्या वेळी कुऱ्हाड, काठ्यांनी, गज,घेऊन माझ्या पतीला मारहाण करून डोक्यावर, कपाळावर,ओठावर,खांद्यावर, जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

तसेच माझ्या मुलीला ओट्यावरून ढकलून फिर्यादी च्या केसाला धरून तिला लथाबुक्यांनी मारहाण करून वाईट शिवीगाळ केली,तसेच वादाची शूटिंग काढत असल्याने मुलीला मारहाण करण्यात आल्याच्या कारणावरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजी न .३१३/२०२१ नुसार कलम३०७,४५२,३२४,३२३,५०४,५०६,१४९,१४७,१४८,१४९,प्रमाणे शोभा कैलास अनारसे वय-४०  यांनी फिर्याद दाखल केली आहे.या प्रकरणी दोघे जण जखमी अवस्थेत सिव्हिल दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दुसरी फिर्याद सुधाताई सीताराम रौदळ यांनी दिली की,जागेच्या कारणावरून वाद चालू असून कैलास अनारसे, शोभा अनारसे,दीपक,वैष्णवी,यांनी आमच्या विरोधात पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत तुम्ही साक्षीदार का झालात,तसेच मी लिंग दाखवलेले सी.सी.टी. व्ही.फुटेज त्यांना का दिले असे म्हणून तुम्हाला आता ऍसिड टाकून जाळून जीवे ठार मारतो,अशी धमकी देऊन हातावर,खांद्यावर, तोंडावर,डोळ्यात, पाठीवर,फेकल्याने संगीता अनारसे यांच्या एक डोळा पांढरा झाला आहे.

तसेच मला व माझ्या पतीला काठीने मारहाण करून शिवीगाळ,दमदाटी केल्याची फिर्याद सुधाताई सीताराम रौद्ळ वय-४३ यांनी सोनई पोलीस ठाण्यात ३१४/२०२१ प्रमाणे ३०७,३२६,(अ),३२३,५०४,५०६,३४ प्रमाणें गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परस्पर विरोधी दोन्ही गटाचे जखमी नगर येथील सिव्हिल दवाखान्यात उपचारथी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या जबाबवरून गुन्हे दाखल झाले आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.
close