shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज येथे उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज कुमावत रुजू..!!



------------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:- 

केज येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पंकज कुमावत हे रुजू झाले आहेत.


या बाबतची माहिती अशी की, केज येथील उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत हे सेवानिवृत्त झाल्या पासून केजची जागा रिक्त होती. त्या जागी आता नव्या दमाचे पोलीस अधिकारी पंकज कुमावत हे धुळे येथे प्रशिक्षण संपुन बाहेर पडताच त्यांना केज येथे नियुक्ती मिळाली आहे. पंकज कुमावत हे सन २०१९ च्या बॅचचे ते आयपीएस अधिकारी आहेत. विशेष म्हणजे त्यांचे आणखी एक भाऊ अमित कुमावत हेही आयपीएस अधिकारी असून दुसरा भाऊ संजय कुमावत हे डॉक्टर आहेत. पंकज कुमावत व अमित कुमावत यांची आयपीएस मध्ये ४२३ व ४२४ अशी रँकिंग मिळाली आहे. 


पंकज कुमावत हे राजस्थान राज्यातील झुंझुनू जिल्ह्यातील असून त्यांचे आई वडील हे शिवणकाम करतात. तसेच त्यांनी दोन वेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. 


केज येथे रुजू होताच पंकज कुमावत यांच्याकडून धडाकेबाज कामाची अपेक्षा असून पूर्वी अखिलेश कुमार यांच्या सारख्या गुन्हेगारांवर जरब बसविणाऱ्या कार्यवाही करण्याची नागरिकातून अपेक्षा व्यक्त होत आहे.
close