shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दहीहंडी उत्सव साजरा न करता बक्षिसाची रक्कम अपघात ग्रस्तास व सैनिकांच्या कुटुंबाला भेट-दाभाडे दाम्पत्यांच्या केलेल्या उपक्रमा बद्दल सर्व स्तरातून स्वागत व कौतुक ..


प्रतिनिधी । एरंडोल
प्रमोद चौधरी
एरंडोल भाजपा नगरसेविका छाया दाभाडे आणि सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे यांनी अपघातग्रस्त युवकास उपचारासाठी आर्थिक मदत करून तसेच सैन्य दलातील शहीद जवानाच्या परिवारास आर्थिक मदत करून दहीहंडी अत्यंत साधेपणाने साजरी केली.
      येथील मरी माता चौक मित्र मंडळ व दाभाडे परिवार यांच्या तर्फे दरवर्षी गोकुळाष्टमीला मरीमाता चौकात दहीहंडी साजरी केली जाते. यावर्षी देखील दहीहंडी अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करून अपघात ग्रस्त युवकास उपचारासाठी तसेच वीर मरण झालेल्या सैन्यदलातील जवानाच्या परिवारास आर्थिक मदत देण्याचा निर्णय मंडळाचे पदाधिकारी आणि छाया दाभाडे आणि आनंद दाभाडे यांच्या परिवाराने घेतला शहरातील ओम नगर मधील विजय भालचंद्र जोशी यांचा अपघात झाला असून त्यांच्यावर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत काही दिवसापूर्वी विजय जोशी दुचाकीने जात असताना अचानक त्यांच्यावाहना समोर कुत्रे आल्यामुळे ते खाली पडले त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत नगरसेविका छाया दावडी आणि आनंद दाभाडे यांनी विजय जोशी यांच्या उपचारासाठी 21 हजार रुपयाची मदत करून समाजासमोर आदर्श उभा केला आहे.तसेच सैन्य दलातील जवान राहुल लहू पाटील याचे आजाराने निधन झाल्यामुळे त्यांच्या परिवारास  दाभाडे परिवारा कडून अकरा हजार रुपयाची मदत केली.
नगरसेविका छाया दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे माजी नगरसेवक पापा दाभाडे  मजदूर संघाचे अध्यक्ष सुरेश दाभाडे यांनी यापूर्वी देखील कोणाच्या काळात गरीब नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप केले होते.
सैन्य दलातील जवानांच्या परिवाराला सामाजिक कर्तव्ये या नात्याने मदत केल्यामुळे मानसिक समाधान मिळाल्याचे नगरसेविका छाया दाभाडे आणि आनंद दाभाडे यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक प्रा. मनोज पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे नगरसेवक बबलू चौधरी, शिवसेनेचे शहरप्रमुख कुणाल महाजन, प्रमोद महाजन, सुरेश दाभाडे, अमोल तांबोळी पाटील प्रवीण चौधरी संदीप तांबोळी अमोल सोनवणे आनंदा चौधरी सोनू शिंपी नितीन पांचाळ दीपक पंचायत नितीन लोहार सुनील बडगुजर प्रवीण महाजन यांच्यासह मरीमता चौक मित्र मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

close