अहमदनगर । प्रतिनिधी :-
आज दिनांक ०२ सप्टेंबर, रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या प्रकल्पग्रस्त यांनी विद्यापीठ सेवेत घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यलाय अहमदनगर या ठिकाणी यह आमरण उपोषण प्रकल्पग्रस्त कृती समिती मार्फत सुरू केले होते, आज चौथ्या दिवशी हे उपोषण सुरू असतांना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उपोषणाला भेट देऊन प्राजक्त दादांनी कृषिमंत्री भुसे यांना सदर विषयी मंत्रालयात पत्र काल दिले व विद्यापीठ प्रकल्पग्रस्त बाबत सविस्तर चर्चा करून बैठक लावण्याचे सांगितले, तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ चे मा कुलसचिव लहाळे यांनी आज उपोषण कर्त्यांना भेट देऊन मा कुलसचिव यांनी उच्च स्तरीय बैठक मुबंई येथे येत्या ८ दिवसात घेऊन विद्यापीठ प्रकल्पग्रस्त यांचा नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात येईल.
असे लेखी पत्र दिले आहे.
सदर चर्चा नंतर, राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे व कुलसचिव यांच्या शब्दाला मान देऊन सदर उपोषण मागे घेत आहे असे प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष संतोष पानसंबळ यांनी सांगितले,
या वेळी उपाध्यक्ष विजय शेडगे यांनी सांगितले की येत्या आठ दिवसाच्या आत बैठक मध्ये सदर विषयावर जर सकारात्मक निर्णय होणे आवश्यक आहे, नाहीतर २० सप्टेंबर नंतर राहुरी विद्यापीठ येथे तीव्र आंदोलन सुरू करण्यात येईल, तसेच राहुरी तालुक्यातील सहा गावाचा हा जो प्रश्न आहे. शेतकऱ्यांना विद्यापीठ प्रशासनाने त्वरित योग्य कार्यवाही करावी असे प्रकल्पग्रस्त कृती समितीचे संघटक सम्राट लांडगे यांनी सांगितले.
या वेळी सचिव राहुल शेटे, सहसचिव श्रीकांत बाचकर, अक्षय काळे, लक्ष्मीकांत वाघ, यांनी देखील प्रशासनाने योग्य कार्यवाही करण्याची मागणी देखील केली, या वेळी सदर उपोषण ठिकाणी जिल्हापूनर्वसन अधिकारी अहमदनगर, राज्यमंत्री तनपुरे, विद्यापीठ कुलसचिव लहाळे , माजी पंचायत समिती सभापती रवींद्र आढाव, माजी सभापती बाळासाहेब लटके, व इतर अधिकारी व प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

