प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ५/ करमाळा तालुका शहरांमध्ये करमाळा नगरपालिका तर्फे कोरोनाचा टेस्टिंग कॅम्प लावण्यात आला करमाळा शहरांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोणाची रुग्ण संख्या वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे करमाळा नगरपालिकेने करमाळा येथील सुभाष चौक येथे आज कोरोना टेस्टिंग कॅम्प लावला. चौकात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची अँटीजन टेस्ट घेण्यात आली.
करमाळा शहरामध्ये गेल्या काही दिवसात कोरोणाची रुग्ण संख्या वाढत होती त्यामुळे स्वतः जिल्हाधिकारी साहेबांनी करमाळा शहरात येऊन येथील पाहणी केली होती व १३ दिवसाचे लॉक डाउनही टाकले होते. वाढत्या रुग्णसंख्या वर आळा घालण्यासाठी नगरपालिकेने टेस्टिंग कॅम्पचे आयोजन केले. पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींना कोवीड सेंटरमध्ये दाखल करणार असल्याचे संबंधित वैद्यकीय अधिकारी व नगरपालिका प्रशासनाने सांगितले. शिक्षक दिन असतानासुद्धा काही शिक्षक वर्ग कोरोना टेस्टिंग कॅम्प मध्ये आपले कर्तव्य बजावताना दिसून येत होते.
या कॅम्प ची जबाबदारी डॉ. गणेश राऊत ( वैद्यकीय अधिकारी ), खंडू चांदगुडे ( लिपिक ), इंदुमती शिंदे ( लिपिक ), मधुरा साखरे ( C.I.T.C .इंजिनीयर ), विक्रम राऊत ( शिक्षक ), लता उबाळे ( शिक्षिका ), इत्यादींनी व्यवस्थित रित्या अगदी पूर्ण जबाबदारीने पार पाडली. दुपारी एक वाजेपर्यंत १३०/ जणांचे टेस्टिंग करण्यात आले यामध्ये एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आली नाही.
हा टेस्टींग कॅम्प पुढही चालू रहाणार आहे असे सांगण्यात आले.

