shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहाता मंडळातील गावांमध्ये मंडळ अधिकारी मोहसिन शेख यांचे 'ई पिक पाहणी' संदर्भात प्रशिक्षण...!!


राहाता । प्रतिनिधी :
राहाता तालुक्यातील तरकसवाडी व अस्तगाव येथील  शेतकऱ्यांना 'ई-पीक पाहणी' कार्यक्रमाची माहिती, तसेच ॲप वापरा, संदर्भातील माहिती, तसेच शेतक-यांनी शेतामध्ये जाऊन ॲप द्वारे माहिती कशी अपलोड करायची या संदर्भातील माहिती उपविभागीय अधिकारी शिर्डी गोविंद शिंदे व तहसिलदार राहाता कुंदन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली राहाता मंडळाचे मंडळ अधिकारी मोहसिन शेख व संबंधित गावचे तलाठी हे देत आहेत.

भविष्यात नैसर्गिक अपतीचे नुकसान असेल पीक विमा योजनेची भरपाई असेल तसेच कृषी विभागाच्या योजना,पीएम किसान योजना असेल यांच्या लाभासाठी ई-पीक पाहणी कशी करून घ्यायची याची माहिती सर्व शेतकऱ्यांना करणे गरजेचे आहे. तरकसवाडी व अस्तगाव येथील शेतकऱ्यांना या ॲप संदर्भातील प्रशिक्षण शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन दिले.

तसेच राहाता मंडळ मधील इतर गावातील शेतकऱ्यांना लवकरच प्रत्यक्षात शेतात जाऊन ॲप संदर्भातील माहिती, देणार असल्याचे मंडळ अधिकारी  मोहसिन शेख यांनी सांगितले. तसेच राहाता मंडळ व परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी ॲपच्या माध्यमातून 'ई-पीक पाहणी' करण्याचे आव्हान केले.
close