प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
कुर्डुवाडी : दि . ५ / नॅशनल रेल्वे मजदूर युनियन कुर्डूवाडी यांच्या वतीने दि. ३/९/२०२१. रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदान शिबिराचे उदघाटन छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सुरुवात करण्यात आली. या रक्तदान शिबिराला नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या सर्व जणांनी भरभरून प्रतिसाद दिला.
रक्तदान शिबिराच्या उदघाटनच्या वेळेस श्री . संजय साळवे( Dy.CME) कुर्डूवाडी कारखाना, श्री सुनील कुमार (AWM), श्री जय प्रताप प्रसाद ( सि. सेक्शन इंजिनीयर), श्री ठाकरे साहेब (सि. सेक्शन इंजिनीयर), श्री सज्जी जेकब(मंडल सचिव), श्री ज्ञानेश्वर भोईर(शाखा अध्यक्ष), श्री स्वप्नील शहाणे(शाखा सचिव), अतुल सावंत (ई.सी.सी. सोसायटी डेलिगेट सोलापूर), श्री बी के सिंग(इ.सी.सी. सोसायटी डेलिगेट सोलापूर), श्री सतीश जगताप(ई.सी.सी. सोसायटी डेलिगेट सोलापूर), व नॅशनल रेल्वे मजदूर युनियन कुर्डवाडी चे सर्व कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.
मानवतेचे भान राखत सर्व धर्म समभाव पाळत व काळाची गरज ओळखून समाजसेवेचा ध्यास मनी बाळगत या रक्तदान शिबिराला दिवसभरात एकूण १८३ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
सदरचे झालेले सर्व रक्तदान दमानी ब्लड बँक सोलापूर यांच्याकडे सोपवण्यात आले.

