-----------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-केज तालुक्यातील लाडेगाव येथील गायरान जमिनी प्रकरणी सकल मराठा समाजानेही आता त्यांच्यावर केलेल्या केसेस या खोट्या असून त्या मागे घेण्यात याव्यात ह्या साठी दि २० सप्टेंबर सोमवार रोजी रास्ता रोको आंदोलन केले.
केज तालुक्यातील लाडेगाव येथील गायरान प्रकरण चांगलेच तापले असून मराठा समाजाने त्यांच्यावर केलेल्या ॲट्रॉसिटी केसेसमुळे गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. सदर केसेस या खोट्या असून त्याची चौकशी सीबीआय किंवा सीआयडी मार्फत करण्याची मागणी केली आहे. तसेच दलित समाजा पासून संरक्षणाची देखील मागणी केली आहे. या त्यांच्या मागणीसाठी व गुन्हे मागे घेण्या संदर्भात २० सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी १०:३० वा. कळंब-अंबाजोगाई रोडवर बोरीसावरगाव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी लाडेगाव येथील सकळ मराठा समाजातील स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी नायब तहसीलदार लक्ष्मण धस यांनी आंदोलकाचे मागण्यांचे निवेदन स्विकारले.
निवेदनावर नवनाथ अंबाड, विशाल अंबाड, दत्तात्रय अंबाड, विलास अंबाड, दिगंबर मुळे, नागेश क्षिसागर, पांडुरंग माने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-------------------------------------------

