-----------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज तालुक्यातील लाडेगाव येथील गायरान प्रकरणा वरून तालुक्यातील सर्व दलित पक्ष व संघटना आक्रमक झाल्या असून दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या बॅनरखाली एकत्र येऊन आज दि. २१ सप्टेंबर मंगळवार रोजी सर्वपक्षीय आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
लाडेगाव ता. केज येथील गायरान प्रकरणा वरून सर्व दलित संघटना व पक्ष एकत्र आले आहेत. दि. २१ सप्टेंबर मंगळवार रोजी ११:३० वा. केज तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे
सपोनि संदीप दहिफळे व बिट जमादार डोईफोडे यांना निलंबित करावे. दलित समाजातील अतिक्रमण धारकांना विरोध करण्यासाठी या गायरान जमिनीवर राबविण्यात येणार असलेले वनीकरण आणि नियोजित सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्यात यावा. गायरान जमिनितील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावे. गायरान जमिनीशी अर्था-अर्थी काही एक संबंध नसणारे सवर्ण समाजातील गावगुंड हे दलित समाजावर अन्याय करीत असताना व त्यांच्या गुन्हे दाखल असतानाही प्रशासन कार्यवाही करीत नसल्याने दलित वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच दलित समाज हा गुन्हेगारी प्रवर्गातील नाही तरी आकसापोटी त्यांच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल केले गेले आहेत. त्यामुळे प्रशासनाने सामाजिक सलोखा व ऐक्य अबाधित ठेण्याचा प्रयत्न करावा. या मागण्या आहेत. या आंदोलकांच्या मागण्या आहेत.
----------------------------------------------

