shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांचा गुटखा विक्री थांबविण्यासाठी सक्रिय सहभाग महत्त्वाचा..- अन्न व औषध प्रशासन, अहमदनगर...!


अन्न व औषध प्रशासन अहमदनगरचा उपक्रम..!

अहमदनगर । विशेष प्रतिनिधी(रमेश जेठे) :-
अहमदनगर जिल्ह्यातील शहर, ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर गुटखा/ पानमसाला, सुगंधी तंबाखू पान टपरी, किराणा दुकानातून शासन निर्बंध असताना उपलब्ध होत आहे. हे भविष्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

आजची पीढी या पदार्थांच्या विळख्यात पुर्ण पणे गुरफटल्या गेली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबाचे कुटुंब उध्वस्त होत आहेत. ही आजची खरी वस्तुस्थिती आहे. 
अशा पदार्थांचे विक्रीवर नियंत्रण आणणे साठी सर्व नागरिकांनी पुढे येवून कारवाई मध्ये सहभागी होणं आजच्या काळाची नितांत गरज आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त श्री किशोर गोरे यांनी जनतेस आवाहन केले आहे की त्यांनी त्यांच्या जवळपास गुटखा/ पानमसाला, सुगंधी तंबाखू विक्री होत असल्याचे आढळून आल्यास ( पान टपरी / किराणा दुकान इत्यादी) किंवा इतर कोणतीही भेसळ आढळुन आल्यास अशा ठिकाणाची प्रशासनाचे खालील क्रमांकावर संपर्क साधुन  तातडीने माहिती द्यावी. 
टोल फ्री क्रमांक १८०० २२ २३६५ ( मुंबई कार्यालय)
नागरिकांना विनंती करण्यात येते आहे की, त्यांनी वर नमुद टोल फ्री क्रमांकावर तपशीलवार योग्य माहिती द्यावी. असे आवाहनही अन्न  व औषध प्रशासन अहमदनगर कार्यालयाने केले आहे.
close