shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लाडक्या विघ्नहर्त्या बाप्पाचे घरोघरी आगमन,भक्तांच्या उत्साहाला उधाण,प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‛ एक गाव एक गणपती ’ ची एरंडोल येथे स्थापना.

प्रमोद चौधरी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी

गणपती बाप्पा मोरया....च्या गजरात आज एरंडोल शहरात श्री गणेशाचे स्वागत करण्यात आले. घरगुती, सार्वजनिक गणेश मंडळात आज श्रींच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली. बाप्‍पाचे आगमनाच्‍यावेळी पावसाने देखील जोरदार हजेरी लावली. यामुळे उत्‍साह द्विगुणीक झाला होता. सलग दुसऱ्या वर्षी ‘ना ढोल..ना ताशे...ना वाद्यांचा गजर, ना मिरवणूका...’ तरीही जल्लोष व भक्तीमय वातावरण अनुभवण्यास आले तसेच, 
कोरनाचे सर्व नियम पाळून एरंडोल येथे इतिहासात प्रथमच एरंडोल शहर पोलीस प्रशासन, एरंडोल नगरपरिषद प्रशासन, एरंडोल महसूल विभाग, एरंडोल शहर शांतता कमिटी, शहरातील नोंदणीकृत व बिगर नोंदणीकृत गणेश मंडळ यांच्या पुढाकाराने एक_गावं_एक_गणपती या संकल्पनेतून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला व श्री गणरायाची विधिवत स्थापना रा.ति. काबरे विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आली.
 तसेच शहरातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सन्माननीय पत्रकार बांधव, फोटोग्राफर असोसिएशन सर्व गणेशमंडळांचे सदस्यांची उपस्थिती होती.
दहा दिवस सर्व शासकीय नियमांचे पालन करून विविध उपक्रमांनी साजरा होणार आहेत.  त्याची रूपरेषा खालील प्रमाणे.
close