शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह राहुरी तालुका प्रतिनिधी दिपक हरिश्चंद्रे.
राहुरी: बारागाव नांदूर गटाचे जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सदस्य मा.श्री.धनराज गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित त्यांच्या संपूर्ण गटातील जवळपास १४ गावामध्ये मोफत तेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केले आहे. त्या शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अंदाजे साठ रुग्णांवर यशस्वीरित्या हि शस्त्रक्रिया करण्यात आली. अनेकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हाहन त्यांनी या वेळी केले.
“निरोगी दृष्टी देऊया,वडीलधार्यांच्या नजरेत राहुयात” असे सांगत बारागाव नांदूर जिल्ह अप्रीश्द गटामध्ये नगरविकास,आदिवासी विकास,मदत आणि पुनर्वसन,उर्जा राज्य मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जीखा परिषद सदस्य श्री.धनराज गाडे यांनी स्वर्गवासी शिवाजी राजे गाडेयांच्या स्मरणार्थ हे नेत्र रोग शिबीर आयोजित केले.
सदरचे शिबीर हे दिनांक २० सप्टेंबर पासून सुरु असून शेरी चीखलठाण या ठिकाणहून येथून शिबिरांला प्रारंभ होऊन म्हैसगाव,आग्रेवाडी,दरडगावं थडी,ताहाराबाद,चिंचाळे,कुरणवाडी,बारागाव नांदूर,डिग्रस,राहुरी खुर्द,पिंप्री अवघड,सडे,घोरपडवाडी,मल्हारवाडी,मोमीन आखाडा,वरवंडी,मुळानगर, या गावांसह वाड्या-वस्त्यावर शिबिरे घेतली जात आहेत. या दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून शिबिरास अधिक प्रतिसाद लाभला आहे.
शेकडो रुग्णांनी या शिबिरामध्ये हजेरी लावली आहे, तर आत्तापर्यंत शिबिराच्या माध्यमातून ६० रुग्णांवर शाश्स्वी शाश्त्रक्रिया करण्यात आली. तर दिनांक ०४ ओक्टोंबरपर्यंतहे शिबीर घेतले जाणार असून याचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनि घ्यावा असे आव्हाहन सदस्य श्री.धनराज गाडे यांनी या वेळी केले आहे.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (राहुरी- तालुका प्रतिनिधी )📲7350591600

