shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"माजी आमदार शिवाजी कर्डीले यांना राहुरी मद्ये राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा दे धक्का" ; राहुरी येथील विद्यमान नगरसेवक शहाजी जाधव यांच्या समवेत सर्वच खंदे समर्थकांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा राहुरी तालुका प्रतिनिधी दिपक हरिश्चंद्रे.

अहमदनगर: दिनांक २५ सप्टेंबर,(प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांसह बाजार समित्या, सहकारी संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपचे कट्टर समर्थक आपल्या कवेत घेण्यास सुरवात केली आहे. याचाच भाग म्हणून राहुरीत देखिल राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे मागे राहिले नाहीत, त्यांनी भाजपचे दिग्गज नेते माजी मंत्री शिवाजी कर्डीलेंना मोठा धक्का दिला आहे.राहुरी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे खंदे समर्थक नगरपालिकेचे नगरसेवक शहाजी जाधव (ठाकूर) यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माजी आमदार कर्डिलेंना दिलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

"नगरविकास, आदिवासी विकास, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे या वेळी बोलताना म्हणाले की,  राहुरीचे नगरसेवक श्री. शहाजी जाधव यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे, त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. मी नगराध्यक्ष असताना श्री. शहाजी जाधव यांच्याशी माझा परिचय झाला. सर्वसामान्य जनतेसाठी झगडणारा नेता ही त्यांची प्रतिमा आजही कायम आहे. पक्ष संघटनेसाठी, राहुरीच्या विकासासाठी आम्ही सोबत जोडले गेलो आहोत ही समाधानाची बाब आहे."

      या पक्ष प्रवेशासाठी शनिवार २४ सप्टेंबर रोजी अहमदनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा झाला. जिल्हा सरचिटणीस सुनील आडसुरे, राहुरीचे नगराध्यक्ष अनिल कासार, रोहिदास कर्डिले, प्रकाश भुजाडी, बाळासाहेब उंडे, दशरथ पोपळघट, संजय साळवे, राष्ट्रवादी कला, सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. श्याम शिंदे आदि प्रसंगी उपस्थित होते.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (राहुरी- तालुका प्रतिनिधी )📲7350591600

close