shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण(९७) मोह Madhuca longifolia (indica)



पर्यावरण जनजागरणाच्या दृष्टीने नक्षत्रवनाचा विचार केल्यास मीन राशीच्या रेवती नक्षत्राचा आराध्यवृक्ष मोह हा आहे. समुद्रसपाटीपासून बाराशे मीटर उंचीपर्यंत सरासरी ५५० ते १८७५ मिलिमीटर पर्जन्यमानाच्या प्रदेशात ४८ डिग्री सेल्सियस तापमानापर्यंतच्या वातावरणात, गाळाच्या जमिनीत तसेच हलक्या, दगडाच्या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेल्या जमिनीत, भरपूर सूर्यप्रकाश असेल तेथे हा वृक्ष उत्तम येतो.

मोहाची पाने दाट हिरवी १२.७ सेंटीमीटर लांब व १० ते १२ सेंटीमीटर रुंद असतात. यावर पिवळ्या रंगांच्या १२ शिरा ठळक दिसतात.मोहाला मार्च एप्रिल महिन्यात  गोड चवीची,  पांढरी, पिवळी, मादक, उग्रवासाची फुले येतात. तसेच जुन -ऑगस्टपर्यंत फळे येतात. यात एक ते दोन बिया असतात. बीपासून ५५ टक्के तेल मिळते. हे पिवळ्या रंगाचे व साबणात वापरण्यासाठी उपयुक्त तसेच वेदनाशामक असते.

मोहाची साल कफनाशक आहे. मोहाची फुले हृदयाची शक्ती वाढवतात. तेलाने वेदना कमी होतात. कुष्ठरोगात मोहाच्या फुलांचा रस त्वचेला चोळतात. बलवृद्धीसाठी मोहाची फुले उपयुक्त असतात. मोहाच्या फुलात शर्करा व कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते यामुळे त्याचा अन्न म्हणूनही वापर होतो. मोहाच्या फुलात पीठ मळून भाकरी करतात. फुलांपासून मधुकारिष्ट तसेच मद्य बनवतात. 

मोहाचे लाकूड टणक, टिकाऊ, वजनाला जड असून गाभा लालसर चॉकलेटी असतो. हा वृक्ष गर्द पानांचा असल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा लावण्यास उपयोगी असतो. याच्या पानापासून पत्रावळी देखील बनवतात. मोहाच्या फुलांपासून मधूकारीष्ट तसेच मद्य बनवितात.
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 

लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५

*कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत..
*पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियानांतर्गत पर्यावरण विचार या ग्रंथात प्रकाशित लेख.



_____
close