मारडकर यांच्या प्रामाणिक पणाचे आणि पोलिसांचे होत आहे कौतुक
प्रतिनिधी : संजय वायकर
करमाळा : दि . १९ / कामानिमित्त करमाळा शहरात आलेल्या व्यक्तीचे हरविलेले दोन लाख रूपए करमाळा पोलिसांच्या तत्परतेने आणि शहरातीलच प्रामाणिक इसमामुळे परत मिळाले .
राजेश नारायण तालापल्ली रा. परांडा जिल्हा उस्मानाबाद हे काही कामानिमित्त करमाळा येथे आले असता त्यांचे जवळील दोन लाख रुपए असणारी बॅग अनवधनाने हरविली. ही बाब राजेश यांच्या लक्षात येताच त्यांनी ताबडतोब
पोलीस स्टेशनशी संपर्क साधला व तक्रार केली.
करमाळा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे साहेब यांच्या आदेशाने तात्काळ करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल देवकर ,पोलीस नाईक चंद्रकांत ढवळे, पोलीस कॉन्स्टेबल काझी, पो कॉ सोमनाथ जगताप , पो कॉ गणेश खोटे यांनी तात्काळ तपास केला असता सुनील रामचंद्र मारडकर रा . फंड गल्ली करमाळा यांनी पैसे सापडले असल्याचे सांगितले.
सदर रक्कम ताब्यात घेवून राजेश तालापल्ली यांना ही रक्कम उपस्थित नागरिकांसमोर ताबडतोब देण्यात आली.
सुनिल मारडकर यांनी दाखविलेल्या प्रामाणिक पणाचे बक्षिस म्हणून त्यांना दहा हजार रुपयांचे राजेश यांचेकडून बक्षिस देण्यात आले.
करमाळा पोलिसांनी दाखविलेल्या कार्यतत्परतेचे आणि मारडकर यांच्या प्रामाणिक पणाचे राजेश तालापल्ली यांनी आभार व्यक्त केले .

