shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर जिल्हा बुध्दीबळ संघटना आयोजित Simultaneous Bouncer या स्पर्धेचे उद्घाटन संपन्न


प्रतिनिधी:  सुर्यकांत होनप

   अ.नगर: दि.१९/ महाराष्ट्रराज्य बुद्धीबळ संघटनेचे उपाध्यक्ष व अहमदनगर जिल्हा बुध्दीबळ संघटनेचे अध्यक्ष आदरणीय श्री नरेंद्र फिरोदिया सर यांच्या हस्ते आँनलाईन उद्घाटन होऊन simultaneous bouncer या स्पर्धेस सुरुवात झाली आहे. 


उदघाटन समारंभात फिरोदिया सर म्हणाले लवकरच कोरोनाचे वातावरण निवळल्यानंतर प्रत्यक्ष बोर्ड वर निरनिराळ्या स्पर्धा आयोजित करण्यात येईल. कोरोनाच्या काळात सुद्धा अनेक आँनलाईन स्पर्धा अहमदनगर जिल्हा बुद्धिब संघटनेने घेऊन खेळाडूंना बुद्धीबळ खेळाची संधी दिली.अहमदनगर जिल्हा बुध्दीबळ स़ंघटना नेहमी खेळाडूंच्या पाठीशी उभी राहून नवनवीन उपक्रम व स्पर्धा आयोजन करण्यावर नेहमीच प्राधान्य देत राहिल असे आवर्जून आपल्या मनोगतातून आदरणीय श्री नरेंद्र फिरोदिया सर यांनी व्यक्त केले व सर्व सहभागी खेळाडूंना या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

   स्पर्धचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव श्री . यशवंत बापट सर यांनी केले. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 60 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.या सर्वांचे स्वागत करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या. 

यानिमित्ताने सुयोग वाघ , सत्यम वरुडे, अखिलेश नगरे  या नगरच्या खेळाडूंनी  संघटना आयोजित करत असलेल्या नवनवीन उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. अहमदनगर जिल्हा बुध्दीबळ संघटनेचे विश्वस्त श्री . पारुनाथ ढोकळे सर यांनी स्पर्धेचे सुत्रसंचलन करुन श्री .सुबोध ठोंबरे ह्यानी सर्वांचे आभार व्यक्त केले.
close