shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

करमाळा भाजपा च्या वतीने कोजागिरी पौर्णिमा निमित्त 1000 ली दूध वाटप ...

प्रतिनिधी : संतोष वायकर

करमाळा : २१ /   करमाळा शहरातील मुख्य चौक असलेल्या सुभाष चौकात भाजपाच्या वतीने करमाळा शहरातील नागरिकांसाठी कोजागिरी पौर्णिमाचे औचित्य साधत दूध वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे शहर अध्यक्ष जगदीश आगरवाल यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टी चे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे मा.चेअरमन संतोष पाटील, जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, अर्बन बँकेचे  चेअरमन कन्हैयालाल देवी, तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे, युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक चव्हाण या व इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दुधाचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी मा.नगरसेवक विजय देशपांडे,  संजय गांधी योजनेचे सदस्य नरेंद्रसिंह ठाकूर, शहर सरचिटणीस मुन्नाशेठ हसीजा,सहकर आघाडी चे सचिन चव्हाण, व्यापार आघाडीचे जितेश कटारिया, सचिन दुधे, संजय घोरपडे, प्रियाल आगरवाल, नितीन कांबळे सहकार आघाडीचे  सचिन चव्हाण,संजय जमदाडे, गणेश वाशिंबेकर, प्रणय आगरवाल व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित  होते.
close