shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

11ऑक्टोबरला बीड जिल्हा बंद..!!

सहभागी व्हा...बजरंग सोनवणे..!!        

 प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-

उत्तर प्रदेशातील लखीमपूर या ठिकाणी शेतकऱ्यांना निर्दयीपणे चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची दिली आहे, त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातही बंद पाळला जाणार असल्याचे बजरंग सोनवणे यांनी सांगितले आहे.

          


लखीमपूर खेरी या गावातील शेतकऱ्यांना केंद्रातील मंत्राच्या गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रकार हा अतिशय निंदनीय व चीड आणणारा आहे.आपल्या देशात शेतकऱ्यांना केंद्रशासनाकडून आशा प्रकारची वागणूक दिली जात असल्या कारणावरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या आदेशानुसार ,बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.धनंजय मुंडे साहेब,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार व नेते यांच्या नेतृत्वाखाली तालुका निहाय बंद पाळणार असून या बंदला जनतेने,व्यवसायिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी केले आहे.

close