प्रकाश मुंडे| बीड जिल्हा प्रतिनिधी :-
सामाजिक जागरूकता आणि प्रशासनाला जाणिवेचा चिमटा काढण्यासाठी जिओ जिंदगी" यांनी "सेल्फी विथ खड्डा " ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम शनिवार रोजी घेण्यात आला. हनुमंत सौदागर ,दत्ता इंगळे , , जिओ जिंदगी टीम प्रमुख पुरुषोत्तम सत्वधर, दादासाहेब कराड आदींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.प्रथम क्रमांक भारत बोबडे, द्वितीय रोहित कसबे ,तृतीय गोरख चिंचकर , तृतीय रोहित गुंड यांना रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रमुख पाहुणे सौदागर यांनी या स्पर्धेचे कौतुक केले. फोटोमधून परिसरातील समस्या समोर आल्या. रस्त्यांची स्थिती फोटोमधून समोर आली.एक फोटो हजार शब्दाचे काम करतो असे मत व्यक्त केले. कराड यांनी पांदण रस्ता व गावातील रास्ता याचा काळाबाजारामुळेच आपला देश मागे आहे देशाची सुधारणा करायची गरज असेल तर रस्ते सुधारले पाहिजे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमास संदीप नाईकवाडे, संजूबाबा लोंढे,दादासाहेब कराड,ज्ञानेश्वर गुंड, हनुमंत साने ,हंडीबाग ,सचिन सोनवणे,गणेश लोंढे,सचिन लोंढे,रोहित कसबे,आणि इतर मान्यवर, विजेत्यांचे अभिनंदन करून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत साने यांनी तर आभार कसबे यांनी केले.

