प्रकाश मुंडे| बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज येथील वसंत महाविद्यालयातील सेवानिवृत्त ग्रंथपाल एम.डी.देशमुख व सरस्वती कन्या प्रशालेच्या शिक्षिका श्रीमती सुर्यवंशी यांचा मुलगा चि. निखिल माणिकराव देशमुख याची एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी या राजपत्रित अधिकारी पदी निवड झाली.या यशाबद्दल माजी मंत्री अशोकराव पाटील,खा रजनीताई पाटील, शिवाजी शिक्षण संस्थेचे रमेशराव आडसकर, मा नगराध्यक्ष आदित्य पाटील, आदींनी अभिनंदन केले आहे.
शालेय शिक्षण गढीच्या जवाहर नवोदय विद्यालय येथून घेतले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे संगणक अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली होती. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक,अभिनंदन होत आहे.

